![]()
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषण करण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या अर्जाला रविवारी पोलिसांनी परवानगी नाकारली. या नकारानंतर जरांगे पाटील यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतला असून, त्यांनी आपले आंदोलन आणखी तीव्र केले आहे. काल मध्यरात्रीपासून त्यांनी वैद्यकीय उपचार आणि पाणी घेणे पूर्णपणे बंद केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा १७ वा दिवस असून, दुपारी ते माध्यमांशी संवाद साधून मोठी घोषणा करणार आहेत. त्यांच्या या घोषणेमुळे राज्य सरकारसमोरील पेच आणखी वाढण्याची शक्यता आहे. उपचारास नकार आणि कायदेशीर लढाईची तयारी पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर अंतरवाली सराटी येथे रविवारी रात्री वैद्यकीय पथकाने दोन वेळा जरांगे पाटील यांची तपासणी करण्यासाठी धाव घेतली होती. मात्र, त्यांनी सलाईन घेण्यास आणि उपचार करण्यास स्पष्ट नकार दिला. परवानगी नाकारली असली तरी जरांगे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. त्यांनी आझाद मैदान पोलिसांकडे नव्याने दुसरा अर्ज दाखल केला आहे. जर पुन्हा परवानगी नाकारली गेली, तर न्यायालयात धाव घेण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. पाटोद्यात पहिल्या मुक्कामाची जय्यत तयारी पोलिसांचा नकार असला तरी मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज १५ सप्टेंबरला मुंबईकडे कूच करण्यावर ठाम आहे. त्यांच्या प्रवासातील पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे असणार आहे. काल पाटोद्यात पार पडलेल्या पूर्व नियोजन बैठकीनंतर तिथे जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. सरकारची खलबते : ‘वर्षा’वर रात्री तातडीची बैठक; तोडग्यावर विचार मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी रात्री ४५ मिनिटे बैठक झाली. यात मंत्री उदय सामंत, आ. प्रसाद लाड व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते. आंदोलन मुंबईच्या वेशीवरच रोखायचे की पुन्हा चर्चा करायची, राजकीय व प्रशासकीय पातळीवर मार्ग काढण्यावरही मंथन झाले. दरम्यान, गणेशोत्सवामुळे जरांगेंनी तूर्त आंदोलन थांबवावे, अशी विनंती राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. मुंबईला जाण्याचा 5 दिवसांचा मार्ग ——————— हेही वाचा.. मुंबई पोलिसांनी आझाद मैदानात मोर्चाची परवानगी नाकारली: जरांगे पाटील म्हणाले- जेलमध्ये टाकले तरी आता माघार नाही, 15 सप्टेंबरला मराठे मुंबईत धडकणारच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 15 सप्टेंबरपासून ‘मुंबई चलो’ आंदोलनाची हाक देणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. सरकारला गोरगरिबांची अजिबात कदर नाही. आम्ही सरकारला तब्बल 3 वर्षे संधी दिली. आता काय व्हायचे ते मुंबईतच होणार, आम्हाला जेलमध्ये टाकले तरी चालेल, पण हे आंदोलन आता थांबणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. सविस्तर वाचा
Source link
जरांगेंच्या उपोषणाचा 17वा दिवस:सलाइन, पाणी-उपचार सोडले, आझाद मैदानासाठी पुन्हा अर्ज; आज दुपारी करणार मोठी घोषणा