“मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने बहुतांश सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत. ज्या काही उर्वरित मागण्या आहेत, त्या सध्या न्यायालयाच्या विविध टप्प्यांवर असून संविधानाच्या चौकटीतच त्यावर निर्णय होऊ शकतो. अशा वेळी गणेशोत्सवाचे पर्व सुरू असताना मुंबई
.
‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना आणि आरती केल्यानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन, गणेशोत्सवाचा संदेश, राज्यातील ‘यूसीसी’ (UCC) आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताचे राजनैतिक यश यावर सविस्तर भाष्य केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर थेट भाष्य
मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेल्या ‘चलो मुंबई’ आंदोलनावर आणि मागण्यांवर फडणवीस यांनी सरकारची स्पष्ट भूमिका मांडली. फडणवीस म्हणाले, “सरकारने सातत्याने प्रयत्न करून जवळजवळ सगळ्या मागण्या पूर्ण केल्या आहेत. उरलेल्या मागण्यांबाबत कोर्ट आणि संवैधानिक पद्धतींचा अवलंब करावाच लागेल. जे संविधानात्मक आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आहे, ते आम्ही करायला तयार आहोत. मात्र, जे नियम किंवा न्यायालयाच्या आदेशाबाहेर जाते, ते सरकारला करता येणार नाही.”

चर्चेचे दरवाजे नेहमीच खुले
“आम्ही चर्चेचे दरवाजे कधीही बंद केलेले नाहीत. अतिशय खुल्या मनाने सर्व मागण्यांचा विचार झाला आहे,” असे ते म्हणाले. सध्या राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह आहे. “गणेशोत्सवादरम्यान मुंबईत आंदोलन करून भाविकांना आणि नागरिकांना वेठीस धरणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे या आंदोलनाचा पुन्हा विचार करावा,” अशी विनंती त्यांनी जरांगे यांना केली.
राज्यात समान नागरी कायदा (UCC) लवकरच?
महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याच्या प्रश्नावर फडणवीस यांनी सांगितले की, “राज्यात ‘यूसीसी’चा मसुदा तयार करण्यासाठी आधीच एक समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती आपले काम करत असून, लवकरच तिचा अहवाल सरकारला प्राप्त होईल. अहवाल आल्यानंतर आम्ही त्याची तातडीने अंमलबजावणी करू.”
पर्यावरणपूरक आणि पारंपरिक गणेशोत्सवाचे आवाहन
देश-विदेशातील सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना ते म्हणाले, “विघ्नहर्त्याने आपला देश, राज्य, नागरिक आणि बळीराजासमोरील सर्व संकटे दूर करावीत, अशी चरणी प्रार्थना आहे. हा उत्सव साजरा करताना सर्वांनी जास्तीत जास्त पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करावा आणि प्रदूषण टाळून पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करावा.”
‘ब्रिक्स’ (BRICS) परिषदेतील यश आणि विरोधकांवर टीका
‘ब्रिक्स’ परिषदेवरून विरोधकांकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या वादावर फडणवीस यांनी जोरदार प्रहार केला. “ब्रिक्स परिषद ही काही जेवणावळीसाठी किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नव्हती. दिल्ली डिक्लेरेशन एकमुखाने मंजूर झाले, ज्यामध्ये चीन आणि रशियाने स्वाक्षरी करत पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाचा निषेध केला. ग्लोबल साऊथने हे मान्य करणे हा भारताचा प्रचंड मोठा मुत्सद्दी विजय आहे.”
“परंतु ज्यांची बुद्धी संकुचित झाली आहे, ती छोटी माणसे भारताच्या या यशाचे महत्त्व कमी करण्यासाठी शाकाहारी-मांसाहारी जेवणाचा किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचा पोरकट वाद उकरून काढत आहेत,” असा टोला त्यांनी राहुल गांधी आणि विरोधकांना लगावला.
हेही वाचा…
जरांगेंच्या उपोषणाचा 17वा दिवस: सलाइन, पाणी-उपचार सोडले, आझाद मैदानासाठी पुन्हा अर्ज; आज दुपारी करणार मोठी घोषणा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषण करण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या अर्जाला रविवारी पोलिसांनी परवानगी नाकारली. या नकारानंतर जरांगे पाटील यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतला असून, त्यांनी आपले आंदोलन आणखी तीव्र केले आहे. काल मध्यरात्रीपासून त्यांनी वैद्यकीय उपचार आणि पाणी घेणे पूर्णपणे बंद केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा १७ वा दिवस असून, दुपारी ते माध्यमांशी संवाद साधून मोठी घोषणा करणार आहेत. त्यांच्या या घोषणेमुळे राज्य सरकारसमोरील पेच आणखी वाढण्याची शक्यता आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
राज्यभरात लाडक्या बाप्पाचे जल्लोषात आगमन: घराघरांत आणि मंडळामध्ये गणराय विराजमान, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

देशभरासह महाराष्ट्रात आज लाडक्या गणरायाचे जल्लोषात आगमन होत असून, मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने मुंबईतील रस्ते दुमदुमले असून, लालबागचा राजा, गणेश गल्लीचा मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी यांसारख्या प्रसिद्ध गणेश मंडळांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी