![]()
मराठा आरक्षणाचा प्रश्न नसुटल्याने व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर व्यथित होऊन पूर्णा तालुक्यातील सुहागन येथील एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. गणेश साहेबराव भोसले असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.दरम्यान, मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यातीलही ९वी आत्महत्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १३सप्टेंबर रोजी गणेश भोसले शेतात गेले होते. सायंकाळी ५:१५ वाजेच्या सुमारास ते शेतातील आखाड्यावरअसलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहखाली उतरवला. त्या वेळी भोसलेयांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. मृत गणेश भोसले यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत,‘मनोजदादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसल्यामुळे व मराठा आरक्षण मिळत नाही म्हणून आत्महत्या करत आहे,” असा उल्लेख आहे. या प्रकरणी मृत भोसले यांचे मेहुणे विनोद लिंबाजी देवरे (रा. थोरावा, ता. वसमत) यांनी दिलेल्या माहितीवरून पूर्णा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा पोलिस करीत आहेत. दरम्यान, मनोज जरांगे हे आत्महत्या करू नका,असे वारंवार आवाहन करून सुद्धा जिल्ह्यात आत्महत्या होत आहे.
Source link
परभणीत मराठा आरक्षणासाठी शेतकऱ्याने केली आत्महत्या:खिशात आढळली चिठ्ठी; परभणीत 9 वी आत्महत्या