- Marathi News
- National
- Uniform Civil Code, Two Tones In NLA, UCC Will Not Be Applicable In Bihar, Let’s Discuss JDU
पाटणा17 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या २०२९ पूर्वी भाजप-रालोआशासित २१ राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याच्या विधानानंतर राजकारण तापले आहे. यावरून एनडीएमध्येही मतभेद समोर आले. बिहारमध्ये यूसीसी लागू होणार नाही, असे जदयूने स्पष्ट केले आहे.
जदयू आमदार श्याम रजक म्हणाले, हा मुद्दा संसदेत आला होता तेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्पष्ट केले होते की, ते विधेयकाला पाठिंबा देतील. पण बिहारमध्ये ते लागू होऊ देणार नाहीत. पक्षाचे नेते शाह यांची भेट घेऊन यूसीसीच्या मुद्द्यावर चर्चा करतील, असे जदयूचे कार्याध्यक्ष संजय झा यांनी म्हटले.हम पक्षाने शाह यांच्या विधानाचे समर्थन केले.
राऊत म्हणाले-विरोध करू
शिवसेना (ठाकरे गट) खा.संजय राऊत म्हणाले, यूसीसी लागू करणे सोपे नाही. आम्ही याला विरोध करू. यूसीसी लागू केल्यानंतरही शाह पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. द्रमुक नेते टी. के. एलंगोवन यांनी यूसीसी असंवैधानिक असल्याचे म्हटले.
गैर-हिंदूंवर हिंदू कायदा लादण्यासारखे : ओवेसी
एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी शाह यांच्या घोषणेवर प्रश्न उपस्थित केले . यूसीसी हे गैर-हिंदूंवर हिंदू कायदा लादण्यासारखे असेल, असे ते म्हणाले. सरकार यूसीसीबाबत गंभीर असेल तर आधी गोव्यात ते लागू करून दाखवावे, असे आव्हान त्यांनी अमित शाह यांना दिले.