Headlines

गणपती मिरवणुकीत चबुतरा तोडून घुसलेल्या कंटेनरने दोघांना चिरडले:8 जण गंभीर; संतप्त जमावाने चालकाला चाेपले संभाजीनगरजवळ पिंप्रीराजातील घटना



जालना रोडवर पिंप्रीराजाच्या रस्त्यावर गावाच्या गणपतीची मिरवणूक निघाली होती. गणरायाच्या आगमनाचा जल्लोष सुरू असतानाच पिंप्रीराजा येथे सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास बेकाबू कंटेनर मिरवणुकीत घुसला. घटनेच्या १०० मीटर अंतरावर कंटेनर (एमएच २१ बीएच ७४१६)

.

जखमींना तात्काळ संभाजीनगरात हलवण्यात आले. त्यातील दोन जणांचा मृत्यू झाला. रमेश लहुजी बनसोडे (५१) आणि विठ्ठल रामभाऊ जाधव (३८, दोघेही रा. पिंप्रीराजा) अशी मृतांची नावे असून यात ७ जण जखमी आहेत. अचानक घडलेल्या या दुर्घटनेने मिरवणुकीत एकच धावपळ उडाली. ढोल-ताशांचा आवाज थांबून घटनास्थळी आरडाओरड सुरू झाली. ग्रामस्थांनी तातडीने जखमींना रुग्णालयात हलवले. गणेश सुरेश पवार, हर्षवर्धन गणेश पवार, वैभव सोमीनाथ भावले, नामदेव बनसोडे, विष्णू गणेश राजने, अमोल शिवलाल फतपुरे, प्रकाश चंद्रभान पाखरे अशी जखमींची नावे आहेत. करमाड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, जमादार जयसिंग नागलोत यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

ब्रेक फेल की आणखी काही?

ट्रेलरचे ब्रेक नेमके का निकामी झाले, अपघातावेळी त्याचा वेग किती होता आणि दुर्घटनेला अन्य कोणते कारण कारणीभूत ठरले याचा करमाड पोलिस तपास करीत आहेत. गणेशमूर्तीच्या आगमनासाठी जमलेल्या गर्दीतच दोन जीव गेल्याने पिंप्रीराजा गावातील उत्सवाचा आनंद क्षणात शोकात बदलला.

गणपती बघून येतो म्हणून घरातून निघाले… अन्

यातील मृत रमेश बनसोडे हेदेखील ट्रकचालक असून गणेशोत्सवासाठी घरी आले होते. त्या‌ंना दोन मुले व पत्नी आहे. गावच्या गणपतीची मिरवणूक सुरू आहे. ती बघून येतो, असे सांगून ते मिरवणुकीसाठी निघाले होते. रस्त्याच्या बाजूला उभे राहून गणपती पाहत असतानाच ही घटना घडली. त्यांच्या मृत्यूची बातमी घरी कळताच शोककळा पसरली. रात्री उशिरा त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीत आणला होता. त्या वेळी त्यांचे सर्व नातेवाईक घाटीमध्ये आले होते. त्यांचा मुलगा प्रफुल्ल इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत आहे.

देवाचा सोहळा साजरा होत होता. आम्ही गणपतीची मूर्ती खाली उतरवत असताना यमराज बनून तो कंटेनर आम्हाला काही कळण्याच्या आधीच आमच्या मिरवणुकीत भरधाव शिरला. या बाराचाकी कंटेनरखाली माझे किती मित्र, नातेवाईक चिरडले गेले काय माहिती? माझ्या डोळ्यांना जे दिसले त्यात आमच्या शेजारी असलेली एक दुचाकी ५० ते ६० फूट लांब फेकली गेली व समोर फरफटत गेली. काही वेळापूर्वी ‘गणपती बाप्पा मोरया’चा सूर आक्रोशात बदलला होता. दोघे कंटेनरच्या खाली चिरडले गेले होते. आमचे काय चुकले, देवच जाणे, आमच्यासोबत असे विपरीत घडले असावे.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *