![]()
श्री चंद्रेश्वर बाबांच्या कृपाशीर्वादाने, महंत बन्सीपुरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली येथील श्रीक्षेत्र पुरातन चंद्रेश्वर गडावर हरितालिका, श्री गणेश चतुर्थी व ऋषिपंचमी निमित्ताने सालाबादप्रमाणे यंदाही
.
श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड हा प्राचीन काळापासून ऋषी-मुनींच्या वास्तव्याने व तपश्चर्येने पावन झालेला असल्यामुळे हरितालिका व ऋषीपंचमी निमित्ताने महिला भाविकांच्या वतीने प्रथम चंद्रेश्वरबाबा स्वामी दयानंदजी महाराज व द्वितीय चंद्रेश्वरबाबा महामंडलेश्वर स्वामी विद्यानंदपुरीजी महाराज यांचे समाधीपूजन तसेच सप्तऋषी समाधीपूजन करण्यात आले. सकाळपासून महिला भाविकांनी चंद्रेश्वर गडावर दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. चंद्रेश्वर गडाचे महंत प.पू. स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांचे भाविकांनी आशिर्वाद घेतले. याप्रसंगी चंद्रेश्वर महादेव मंदिराचे व्यवस्थापक स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री चंद्रेश्वर सेवा भक्त परिवाराच्या वतीने भाविकांसाठी सेवा समर्पित करण्यात आली. यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. दिवसेंदिवस श्री चंद्रेश्वरगडावरील अ ध्यात्मिक महात्म्या सोबतच नैसर्गिक सौंदर्यामुळे भाविकांची व पर्यटकांची संख्या वाढत आहे.