![]()
दिंडोरी तालुक्यातील पेठ रोडवरील गवळवाडी शिवारातील आर.एम.सी. तसेच डांबर व खडी क्रेशर प्लांटवरून २ लाख २७ हजार रुपयांचे इलेक्ट्रिक कॉपर केबल व डीपीमधील कॉपर प्लेट्स लांबवणाऱ्या सराईत दरोडेखोरांच्या टोळीचा दिंडोरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी इरशाद नहीम शेख आणि रहमान फजल शेख (रा. जेलरोड, नाशिक) यांना अटक करण्यात आली आहे. २ सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या या चोरीप्रकरणी दिंडोरी ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. सहाय्यक पोलिस निरीक्षक सोपान राखोंडे, हरिश्चंद्र पालवी, विश्वनाथ काकड, प्रकाश गायकवाड यांच्यासह पथकाने तपास केला. संशयित हे कार (एमएच १५ एफएफ ८७८६) आणि एका मालवाहतूक गाडीने गुन्ह्याच्या ठिकाणी येत असत. दिशाभूल करण्यासाठी ते मालवाहतूक गाडीत दुधाचे क्रेट ठेवत असल्याचे तपासात समोर आले. संशयितांकडून चोरीचा मुद्देमाल आणि कार जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेले कॉपर चोरी करणारे चोरटे व पथक.
Source link
दोन लाखांची केबल चोरी;सराईत टोळीचा पर्दाफाश:दिंडोरी पोलिसांची कारवाई; चोरीचा मुद्देमाल जप्त