Headlines

दिशा सालियन प्रकरणात 'दूध का दूध, पाणी का पाणी' होईल:बावनकुळेंचा विश्वास, समान नागरी कायद्यावरून विरोधकांवर साधला निशाणा




राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिशा सालियन प्रकरण, समान नागरी कायदा (UCC) आणि राज्यातील दुष्काळ या मुद्द्यांवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. “दिशा सालियन प्रकरणात सीबीआय चौकशीतून ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल,” असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी समान नागरी कायद्यावरून विरोधकांवर सडकून टीका केली. तसेच, राज्यातील १८ दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा अहवाल आज कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांना सादर करणार असल्याची महत्त्वपूर्ण माहितीही त्यांनी दिली. दिशा सालियन प्रकरणात ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल दिशा सालियन प्रकरणात सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरबाबत आणि संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले असता, बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “हा विषय सीबीआय आणि न्यायालयाच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे यावर जास्त बोलणे योग्य नाही. मात्र, सीबीआयची चौकशी निष्पक्ष होईल आणि या चौकशीमध्ये ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होईल. जे सत्य आहे ते नक्कीच समोर येईल, त्यामुळे कुणावरही विनाकारण टीका-टिप्पणी करण्याची गरज नाही.” १८ जिल्ह्यांचा दुष्काळ अहवाल मुख्यमंत्र्यांकडे राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये असलेल्या दुष्काळसदृश परिस्थितीवर बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी माहिती दिली. “मी सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून या १८ जिल्ह्यांचा आढावा घेतला आहे. आज त्यांचा सविस्तर अहवाल माझ्याकडे आला असून, आजच्या कॅबिनेट बैठकीत मी तो माननीय मुख्यमंत्र्यांसमोर सादर करणार आहे. यावर चर्चा होऊन सरकार निश्चितपणे पुढील योग्य कारवाई करेल,” असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. समान नागरी कायदा (UCC) आवश्यकच २०२९ पर्यंत २१ राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घोषणेचे बावनकुळे यांनी जोरदार समर्थन केले. अमित भाईंनी सांगितलेली बाब अत्यंत महत्त्वाची आहे. या देशात समान नागरी कायदा लागू होणे आवश्यकच आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार असले पाहिजेत,” असे ते म्हणाले. हा कायदा राजकीय फायद्यासाठी आणला जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपांवर त्यांनी कडाडून टीका केली. राजस्थान विजयावरून काँग्रेसवर हल्लाबोल राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये (नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिका) ३१९ पैकी २३९ जागांवर भाजपने मिळवलेल्या मोठ्या विजयाचे बावनकुळे यांनी स्वागत केले. १० पैकी ८ महानगरपालिकांमध्ये भाजपची सत्ता येत असल्याचे त्यांनी सांगितले. या यशाचे श्रेय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि स्थानिक नेतृत्वाला दिले. तसेच, “काँग्रेसने ‘वंदे मातरम’ला विरोध करत मतांच्या लालचेपोटी तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण राजस्थानच्या जनतेने आणि तरुणांनी काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांना नाकारून मोदींच्या ‘विकसित भारता’च्या संकल्पाला साथ दिली आहे,” अशी घणाघाती टीका बावनकुळे यांनी केली. जरांगे पाटील आणि पुणे SIT बाबत स्पष्टीकरण मनोज जरांगे पाटील आज मुंबईकडे कूच करत असल्याबाबत विचारले असता, बावनकुळे यांनी अधिक बोलणे टाळले. मुख्यमंत्र्यांनी याबाबत आधीच स्पष्टीकरण दिलेले आहे, असे म्हणत त्यांनी हा विषय संपवला. ————– हेही वाचा.. जरांगेंच्या उपोषणाचा 18वा दिवस, आज मुंबईकडे कूच: आझाद मैदानाच्या परवानगीचा तिढा कायम, तिसऱ्यांदा अर्ज; आंदोलक म्हणाले- आम्ही गणपती पाहायला जाणार मराठा आरक्षणासाठी निर्णायक आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १८ वा दिवस आहे. आझाद मैदान पोलिसांनी आंदोलनासाठी दोन वेळा परवानगी नाकारूनही जरांगे पाटील आणि मराठा समाज आपल्या ‘मुंबई चलो’च्या भूमिकेवर ठाम आहे. आता मनोज जरांगे आणि काही वकिलांनी मिळून तिसऱ्यांदा पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज दाखल केला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *