![]()
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना, जळगाव शहरातील दशरथनगर परिसरातील तळेले कॉलनीत एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. एका 30 वर्षीय विवाहितेने आपल्या अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्यासह गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना काल सायंकाळी उघडकीस आली असून, हेमांगी निखिल महाजन आणि शौर्य महाजन अशी मृत माय-लेकाची नावे आहेत. या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरात गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना आणि पूजेची तयारी सुरू होती. घरातील सर्व सदस्य पूजेच्या गडबडीत असताना हेमांगी महाजन या मुलाला घेऊन खोलीत गेल्या. पूजेची वेळ झाल्यानंतर कुटुंबीय त्यांना बोलावण्यासाठी गेले असता खोलीचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ हाका मारूनही आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने संशय बळावला. कुटुंबीयांनी तातडीने शनिपेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा उघडून पाहिले असता माय-लेकाने गळफास घेतल्याचे निष्पन्न झाले. दोघांनाही तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मृत हेमांगी महाजन यांचे माहेर बांभोरी (ता. धरणगाव) येथे असून, त्यांच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यांचे पती निखिल महाजन हे भारतीय सैन्यदलात कार्यरत असून सध्या राजस्थान येथे सेवा बजावत आहेत. तर त्यांचे दीर तळेले कॉलनीतील गणेश मंडळाचे अध्यक्ष आहेत. आनंदाच्या सणाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत. हे ही वृत्त वाचा
हिंगोलीत पोलिसाच्याच घरात चोरी:उपनिरीक्षकाचे घर फोडले, 2.94 लाखांची रोख अन् दागिने पळवले, दोघांवर गुन्हा दाखल
हिंगोली शहरातील नवीन पोलिस वसाहतीमध्ये पोलिस उपनिरीक्षकाचे घर फोडून चोरटयांनी 2.94 लाख रुपयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 14 रात्री उशीरा दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे तोंडाला रुमाल बांधून असल्यामुळे आता त्यांची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. वाचा सविस्तर
Source link