Headlines

बैल सजावट स्पर्धेला प्रतिसाद; पारंपरिक वेशभूषेत पोळा साजरा:स्पर्धेतून महाराष्ट्रीय संस्कृतीला मिळाली चालना; मान्यवरांकडून कौतूक, विद्यार्थ्यांचा सहभाग ठरला लक्षवेधी‎



ध्रितीज किडझी अँड ध्रिती ग्लोबल स्कूलमध्ये बैलपोळा उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख अतिथि म्हणून नगरसेवक तारेश्वर देशमुख उपस्थित होते.

.

यादरम्यान विधिवत बैलपूजनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत उत्सवाची शोभा वाढविली. रंगीत कागद, फुले व विविध सजावटीच्या साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी बैलांची आकर्षक सजावट केली होती. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सर्जनशीलतेचे उपस्थित मान्यवर व परीक्षकांनी कौतुक केले.

विजेत्या विद्यार्थ्यांना समीर श्रीराव यांच्या वतीने पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी विजेत्यांसह सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे, या उद्देशाने शाळेच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनश्री शेळके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका परिनिता सागर जयस्वाल यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. चमकदार कामगिरी करणाऱ्या विजेत्या विद्यार्थ्यांना समीर श्रीराव यांच्या सौजन्याने पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी केवळ विजेत्यांचेच नव्हे, तर सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले.

दोन गटामधील स्पर्धेच्या विजेत्यांचा विशेष गौरव यावेळी आयोजित बैल सजावट स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धेचे परीक्षण सर्जनशीलता, सजावट, पारंपरिकता आणि सादरीकरणाच्या आधारे करण्यात आले. गट अ मध्ये मितांशी भुजाडे, मायरा खुटाटे, वियान विटाळकर, अर्प्रीत शेंडे व प्रांशी लोहिया यांनी यश मिळविले. गट ब मध्ये वंश कपिले, हंसिका फुसे, भव्या साहू, गोजिरी आढाऊ व सानवी शिंगारवाडे विजेते ठरले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *