Headlines

शिवसेना वाढवताय की स्वतःचा परिवार?:श्वेता महालेंनी संजय गायकवाड यांना पुन्हा डिवचले, नेमका काय आहे वाद? वाचा सविस्तर




बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील दोन आमदारांमध्ये सुरू असलेला संघर्ष अद्यापही थांबताना दिसत नाही. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच, भाजप आमदार श्वेता महाले यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. आपण पक्ष वाढवण्याचे काम करत आहोत, असा दावा आमदार गायकवाड यांनी केला होता. मात्र त्यांच्या याच वक्तव्याचा समाचार घेत श्वेता महाले यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. खऱ्या शिवसैनिकांना डावलून केवळ आपली पत्नी आणि दोन्ही मुलांना जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले जात असल्याचा आरोप आमदार महाले यांनी केला आहे. “तुम्ही शिवसेना पक्ष वाढवत आहात की स्वतःचा परिवार वाढवत आहात?” असा थेट सवाल विचारत त्यांनी गायकवाड यांना डिवचले आहे. आता श्वेता महाले यांच्या या बोचऱ्या टीकेवर आमदार संजय गायकवाड काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असून तूर्तास तरी हा राजकीय संघर्ष मिटण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. ‘हिंमत असेल तर समोरासमोर येऊन लढा’ मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव आणि भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांच्या बुलढाण्यातील वाढदिवसाच्या कार्यक्रमात अचानक वीजपुरवठा खंडित झाला. या प्रकारामागे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा हात असल्याचा अप्रत्यक्ष संशय व्यक्त करत श्वेता महाले यांनी त्यांना नाव न घेता ‘हिंमत असेल तर समोरासमोर येऊन लढा,’ असे खुले आव्हान दिले आहे. त्यांच्या या थेट आव्हानाला आमदार संजय गायकवाड यांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिले असून, ‘राजकारणातला बाप कोण आहे, हे आपण योग्य वेळी दाखवून देऊ,’ असा जोरदार पलटवार त्यांनी केला आहे. कशाला विरोध करता? संजय गायकवाड म्हणाले होते की, श्वेता महाले एक महिला आमदार आहे. माझी बहीण आहे, ताई आहे. मला समोर येऊन बोला म्हटल्या, बँक निवडणुकीत आम्ही सोबत होतो. एका ताटात आम्ही एका चमचाने जेवण केले. त्यामुळे समोर येण्याचा प्रश्नच नाही. वाढदिवसाला स्पर्धा करणे हा काही विषय नव्हता. त्यांनी बुलढाणामध्ये भाजप वाढवावी, आम्ही चिखलीत शिवसेना वाढवू, कशाला विरोध करता? फक्त इकडची भाजप कॉंग्रेसच्या दावणीला बांधल्या जाणार नाही, याची काळजी घ्या, असा सल्लाही गायकवाड यांनी दिला आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. महिला आमदाराबाबत वादग्रस्त वक्तव्य भोवले:आमदार गायकवाडांवर बुलडाण्यात गुन्हा दाखल, रोहित पवारांकडून पोलिसांच्या ‘सिलेक्टिव्ह’ कारवाईवर निशाणा भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांच्या वाढदिवसाच्या रॅलीत वाजवलेल्या गाण्यावरून वाद निर्माण झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केले होते. हे विधान सोशल मीडियावर पसरल्यानंतर एका 42 वर्षीय महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. महिलांच्या लज्जेस धक्का पोहोचवल्याच्या आरोपावरून बुलडाणा शहर पोलिसांनी मध्यरात्री आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. इथे सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *