Headlines

आखाडा बाळापूर परिसरात वारंवार फिरणारा संशयीत निघाला शेळ्या चोर:सात गुन्हे उघडकीस, 7.92 लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी




हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर परिसरात वाहनाद्वारे वारंवार फिरणाऱ्या एका संशयीतांची पोलिसांनी चौकशी करताच तो शेळ्या चोरणारा चोरटा निघाला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी ता. १५ त्याला ताब्यात घेतले. त्याने जिल्हयात सात गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून ७.९२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील वापटी परिसरात ता. ३० ऑगस्ट रोजी एका टीनशेडमध्ये बांधलेल्या ९ शेळ्या चोरटयांनी पळविल्या. या प्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेकडूनही चोरट्यांची माहिती घेतली जात होती. गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत आरसेवार, उपनिरीक्षक माधव जिव्हारे, जमादार भुजंग कोकरे, किशोर सावंत, मुनीर मुन्नीवाले, दत्ता नागरे, आजम प्यारेवाले, विशाल खंडागळे, प्रदीप झुंगरे, मारुती काकडे, इरफान पठाण, हरीभाऊ गुंजकर, शंकर हराळ यांच्या पथकाने माहिती घेण्यास सुरवात केली होती. दरम्यान, आज आखाडा बाळापूर परिसरात एक कार चालक वारंवार फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून संशय आल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली होती. यामध्ये पोलिसांनी कार चालकाची माहिती घेऊन त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने सुरवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याचीच सर्व माहिती सांगितल्यानंतर त्याने त्याचे नांव मोहम्मद सलमान सिद्दीकी (रा. तपोवली, जि. नांदेड, ह. मु. नांदेड) असे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने त्याच्या साथीरादारसह जिल्ह्यातील शेळ्या चोरीचे ०७ गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या गुन्हयातील १.९२लाख रुपये व कार असा ७.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *