![]()
म्हाळसाकोरे-वडांगळी रस्त्याचे काम सुरू असताना आमदार दिलीप बनकर यांनी रस्त्याचे काम तसेच बांधण्यात आलेल्या मोरीच्या गुणवत्तेची पाहणी केली. रस्ता व मोरीचे काम चांगले व टिकाऊ होण्यासाठी रस्त्यालगतच्या शेतकरी बांधवांनी आणि ग्रामस्थांनी कामाच्या गुणवत्तेकडे स्वतः लक्ष देऊन योग्य ती देखरेख करावी, असे आवाहन आमदार बनकर यांनी केले. पाहणीदरम्यान रस्त्यासोबतच बांधण्यात आलेली मोरी अतिशय दर्जेदार व चांगल्या पद्धतीने बांधण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रस्ता आणि मोरीचे काम जास्तीत जास्त चांगले व टिकाऊ व्हावे, तसेच रस्त्याचे यापुढील कामही दर्जेदार पद्धतीने व्हावे, यासाठी ग्रामस्थांनी कामावर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या पाहणी दौऱ्याप्रसंगी आमदार बनकर यांच्या समवेत अण्णाभाऊ मुरकुटे, बाळासाहेब गंगाधर मुरकुटे, सौरभ ढोबळे, योगेश मुरकुटे, राहुल बाजारे यांच्यासह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Source link
म्हाळसाकोरे-वडांगळी रस्त्याची आमदार बनकरांकडून पाहणी:रस्त्याच्या गुणवत्तेवर ग्रामस्थांनी लक्ष ठेवण्याचे आवाहन