Headlines

श्रीगोंद्यातील स्वयंघोषित गोरक्षकांच्या दहशतीविरोधात सर्वपक्षीय आंदोलन, शेतकऱ्याला मारहाण करून अमानुष वर्तन केल्याचा आरोप‎




शेतकऱ्याला रस्त्यात अडवून बेदम मारहाण करून अमानुष वर्तन केल्याप्रकरणी श्रीगोंद्यात सर्वपक्षीय आंदोलकांनी स्वयंघोषित गोरक्षकांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. संबंधित प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी करत आंदोलकांनी तहसीलदार सचिन डोंगरे यांना निवेदन दिले. माजी आमदार राहुल जगताप म्हणाले, प्रतिक पाचपुते याने गोरक्षकाचा आव आणून अवैध धंद्यांमुळे श्रीगोंदे तालुक्याची बदनामी केली आहे, असा आरोप केला. शेतकऱ्याला मारहाण करून अमानुष वर्तन करणाऱ्याला कुणाचा आश्रय आहे, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील गुटखा, ताडी, हातभट्टीची दारू व अन्य अवैध धंद्यांवरही त्यांनी सवाल उपस्थित केला. आमदार विक्रम पाचपुते विधानसभेत विविध प्रश्न मांडत असल्याबद्दल कौतुक करताना शेतकऱ्यांच्या पाण्याचा मूलभूत प्रश्नही त्यांनी प्रभावीपणे मांडावा, अशी अपेक्षा जगताप यांनी व्यक्त केली. भेसळीच्या दुधाच्या मुद्द्यावरही त्यांनी लक्ष वेधले. शेतकरी नेते सागर खोत यांनी गोवंश हत्या बंदीच्या नावाखाली काही जणांकडून शेतकऱ्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप केला. गोरक्षकांच्या कथित अत्याचारामुळे जनावरांचे बाजार अडचणीत आल्याचे ते म्हणाले. बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी काष्टी आठवडे बाजारातील कथित गोरक्षकांच्या हस्तक्षेपामुळे बाजाराचा कर दोन लाखांनी घटल्याचा दावा केला. यावेळी यावेळी घनशाम शेलार, सागर खोत, रवीराज साबळे, अनील ठवाळ, अॅड सुमीत बोरुडे, भानुदास शिंदे, अॅड सुशीलकुमार शिंदे, राजेंद्र निळकंठ नागवडे, अॅड अनील कोकाटे, अख्तारभाई शेख, अजीम जकाते राजेंद्र म्हस्के स्मितल वाबळे अनील चव्हाण संतोष खेतमाळीस नंदकुमार ताडे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक अरविंद कापसे यांनी केले. ज्या शेतकऱ्यास गोरक्षकांनी बेदम मारहाण केली त्या शेतकऱ्याने या आंदोलनाकडे पाठ फिरवली. मात्र गोरक्षकांनी लुटलेले इतर शेतकरी हजर होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *