Headlines

हॉकीच्या मैदानावर गौतमचा दबदबा; जे.एन. स्पर्धेत विजेतेपद:7-0 ने उपांत्य फेरीत, 2-0 ने अंतिम सामन्यात विजय; विभागीय स्पर्धेत अहिल्यानगरचे नेतृत्व करण्याची संधी‎



हॉकीच्या मैदानावरील विजयाची परंपरा कायम राखत गौतम पब्लिक स्कूलच्या सब-ज्युनिअर हॉकी संघाने जिल्हास्तरीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. या विजयामुळे गौतमचा संघ आता विभागीय स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचे नेतृत्व करण

.

प्रवरा पब्लिक स्कूल, लोणी येथे प्रवरा पब्लिक स्कूल व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा झाली. उपांत्य फेरीत गौतम पब्लिक स्कूलने प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलचा तब्बल ७-० असा पराभव केला. कौशल्यपूर्ण पासिंग, वेगवान आक्रमण आणि भक्कम बचावाच्या जोरावर गौतमच्या खेळाडूंनी सामन्यावर सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. अंतिम सामन्यात गौतमसमोर यश अकॅडमी, सोनईचे आव्हान होते. संयमी व नियोजनबद्ध खेळाचे प्रदर्शन करत गौतमने हा सामना २-० असा जिंकत जिल्हास्तरीय विजेतेपदावर आपले नाव कोरले. गौतम पब्लिक स्कूलचा हॉकी संघ यापूर्वीही दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत आला आहे. त्यामुळे विभागीय स्पर्धेतही संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, गौतम पब्लिक स्कूलमध्ये १५ व १६ सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सब-ज्युनिअर व ज्युनिअर मुले-मुलींच्या विभागीय हॉकी स्पर्धाही याच ठिकाणी होणार आहेत. या यशाबद्दल माजी आमदार अशोक काळे, ट्रस्टी आमदार आशुतोष काळे, सचिव चैताली काळे, नारायण बारे, प्राचार्य नूर शेख, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले. विभागीय स्तरावरही उत्कृष्ट कामगिरी करून जिल्ह्याचे नाव उंचवावे, अशी अपेक्षा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

गौतम पब्लिक स्कूलमध्ये दरवर्षी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. यंदा व्हॉलीबॉल, क्रिकेट, फुटबॉल व हॉकीच्या तालुका, जिल्हा, विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. खेळाडूंना दर्जेदार मैदानासह निवास व भोजनाच्या सुविधा देऊन भविष्यातील सक्षम क्रीडापटू घडविणे ही आमची बांधिलकी आहे, असे सचिव चैताली काळे यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *