![]()
श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरातील सिद्धिविनायक मंदिर परिसरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढल्याने भाविकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. या भागात अनेक उच्चभ्रू नागरिकांची वस्ती असून, शुक्रवारी नियमित बाजारासोबत आठवडे बाजारही भरतो. त्यामुळे परिसरात मोठ
.
मोकाट जनावरे रस्त्यावर, चौकात, सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्ता दुभाजकावर ठाण मांडून बसतात. अचानक एखादे जनावर रस्त्यात आल्यास वाहनचालकांची तारांबळ उडते. काही वेळा जनावरे एकमेकांवर हल्ला करीत असल्याने दुचाकीस्वारांच्या अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. याशिवाय जनावरांमुळे मुख्य रस्त्यावर अस्वच्छता निर्माण होत असून, नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
जनावरे मालकांनी त्यांची जनावरे रस्त्यावर मोकाट सोडू नयेत. व होणाऱ्या कारवाईस बळी पडू नये. असे आवाहन श्रीरामपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष करण ससाणे व मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी करूनही जनावरे मोकाट सोडले जात आहेत.आपली जनावरे मोकाट सोडणाऱ्या मालकांविरोधात कारवाई करण्यात यावी आणि ही जनावरे पकडून गोशाळेत दाखल करण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
यापूर्वी ४७ जनावरे पकडली, १७ ऑगस्ट रोजी कारवाई श्रीरामपूर नगरपरिषदेच्या पथकाने १७ ऑगस्ट रोजी गोंधवणी रोड, दशमेश नगर, कुकरेजा बिल्डिंग, शहीद भगतसिंग चौक, मोरगे वस्ती, अक्षय कॉर्नर आदी भागांतून ४७ मोकाट गाय, वासरे व पोळ पकडून गोशाळेत दाखल केले. ही मोहीम दैनंदिनपणे सुरू ठेवून शहराला मोकाट जनावरांच्या त्रासातून कायमची मुक्तता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.