![]()
डॉ. चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थापक संजीव सोनवणे (६५) यांनी शहरातील पद्मानगर येथील घरात गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघड झाली. घटनास्थळी त्यांच्या परवानाधारक शस्त्रासह इंग्रजीतील सुसाइड नोट सापडली. त्यातील ‘स्वीट
.
सोनवणे हे बंगल्यात एकटेच राहत होते. त्यांची पत्नी, मुले व जावई अमेरिकेत आहेत. सोमवारी रात्री जेवण देऊन चालकाने बाहेरून गेटला कुलूप लावले होते. मंगळवारी सकाळी बहीण मंजू घरी आली असता दुसऱ्या मजल्यावरील बेडरूममध्ये ते रक्ताच्या थारोळ्यात आढळले.संबंधित. पान २
१. एकटेपणातून टोकाचे पाऊल? कुटुंबीय अमेरिकेत असल्याने ते एकटेच होते. मानसिक ताण आणि एकटेपणातून त्यांनी हे पाऊल उचलल्याची शक्यता आहे.
२. आजारपणाला कंटाळून? त्यांना काही व्याधींचा सामना करावा लागत होता. आजारपणाला कंटाळून त्यांनी जीवन संपवल्याचाही एक अंदाज आहे.
३. ‘स्वीट फूल’चे गूढ सुसाइड नोटमधील ‘स्वीट फूल’ (गोडपणे मूर्ख बनवणे) असा उल्लेखाची उकल झाल्यास आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल.
हस्ताक्षराची पडताळणी करणार
नातेवाइकांनी सुसाइड नोटमधील हस्ताक्षरसोनवणे यांचेच असल्याचे सांगितलेआहे. तरीही पोलिसांनी त्यावर अंतिमशिक्कामोर्तब केलेले नाही. हस्ताक्षराची खात्री करण्यासाठी हस्ताक्षर नमुन्यांच्याआधारे पडताळणी केली जात आहे.
मूळचे औसा तालुक्यातील मोगरगा येथील रहिवासीअसलेले संजीव सोनवणे यांचे वडील डॉ. चंद्रभानूसोनवणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडाविद्यापीठातील हिंदी विभागप्रमुख होते. त्यांच्यानावानेच त्यांनी लातूर शहरात कनिष्ठ महाविद्यालयस्थापन करण्यात आले होते. त्यांनी धाराशिवतालुक्यातील उक्कडगाव येथे मोठे महाविद्यालयस्थापन केले. पुणे आणि मुंबई येथेही त्यांच्याशैक्षणिक संस्था आहेत.
दोन दिवसांनंतर अंत्यसंस्कार
सोनवणे यांना एक मुलगी आणि एकमुलगा आहे. पत्नी, जावई सध्याअमेरिकेत आहेत. भाऊ मुंबईत तर ३बहिणी पुण्यात आहेत. कुटुंबीयपोहोचण्यासाठी २ दिवस लागतील.त्यामुळे अंत्यविधी १७ सप्टेंबरला होईल.
टुंबाला जबाबदार धरू नये
माझ्या कुटुंबातील कुणालाही यासाठीजबाबदार धरू नये तसेच त्यांना त्रासदेऊ नये,’ अशा आशयाचा मजकूरनोटमध्ये असल्याचे पोलिसांनीसांगितले.नोटमध्ये नमूद असलेले ‘स्वीटफुल’ हे शब्द महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे.