Headlines

गाैरींचा शृंगार; ओटी पॅकेज दरात गतवर्षीपेक्षा 50% वाढ‎:विशेष पॅकेज 700 रुपयाला, साडी, श्रीफळ, हळद-कुंकू, बांगड्या, हार, फुले; शृंगार साहित्यानुसार दरात बदल‎



महालक्ष्मीच्या (गौरी)आगमनासह पूजनाच्या दिवशी धान्य, फळांच्या राशी नेण्यासोबतच ओटी भरण्याचा विशेष मान असतो. त्यातही आता खणा-नारळाची ओटीच भरली जात नाही तर त्यात सोळा शृंगाराचाही समावेश केल्यामुळे या ओटीच्या किंमतीत वाढ झाली. महालक्ष्मीच्या ओटीसाठी लागण

.

परंपरेनुसार महालक्ष्मीच्या ओटीमध्ये साडी, श्रीफळ, हळद-कुंकू, हिरव्या बांगड्या, पानाचा विडा, अक्षता, खारिक, बदाम, हळकंड, सुपारी, तांदूळ, गोड पदार्थ, फुले आणि हार यासह क्षृंगाराचाही समावेश असतो. त्यात साहित्य हे कमी-जास्त करण्याची सुविधाही उपलब्ध असल्याने ग्राहक तयार ओटी पॅकेजला प्राधान्य देत आहेत. महालक्ष्मीचे आगमन म्हणजे उत्साहाचा आणि श्रद्धेचा सोहळा. माहेरवाशीण म्हणून आलेल्या महालक्ष्मीचा लेकीप्रमाणे पाहुणचार करण्याची परंपरा आहे.यानिमित्ताने ज्यांच्याकडे महालक्ष्मीची स्थापना होते त्यांना ओटी भरावीच लागते. सोबतच त्यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या सुवासिनी महिलाही इच्छा व क्षमतेनुसार ओटी अर्पण करतात. त्यामुळे महालक्ष्मीच्या आगमनाच्या दोन दिवस आधीपासूनच ओटीच्या साहित्याला मोठी मागणी असल्याचे दिसले. यंदा बाजारात कमी किमतींच्या ओटींपासून ते विशेष महालक्ष्मी पूजनाच्या पॅकेजपर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत. ग्राहक क्षमता व परंपरेनुसार पॅकेजची निवड करीत आहेत. विशेष म्हणजे महालक्ष्मी बसवणाऱ्या कुटुंबांसाठी स्वतंत्र पॅकेज तयार केले असून, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. धार्मिक मान्यतेनुसार महालक्ष्मींची ओटी भरताना घरातील सुख-समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य, धनधान्य, संततीचे कल्याण आणि अखंड सौभाग्य लाभावे, अशी मनोभावे प्रार्थना केली जाते. श्रद्धा आणि भक्तिभावाने भरलेली ही ओटी घरात सकारात्मकता, समाधान, मंगलमय वातावरण निर्माण करणारी मानली जाते. महालक्ष्मीची ओटी भरणे हा धार्मिक विधी नसून कुटुंबातील स्त्रियांच्या भावविश्वाशी जोडलेला सांस्कृतिक, सामाजिक संस्कार आहे. ७०० रुपयांच्या ओटीच्या पॅकेजमध्ये पारंपरिक नारळ, बांगड्या, हळकंड, बदाम, सुपारी, खरिक, गजरा किंवा वेणी, तादूळ, हळद, कुंकू व एखादे फळ यासह १६ शृंगाराच्या साहित्याचा जसे साडी किंवा खण किंवा ब्लाऊसपीस, मंगळसूत्र,हार, हिरव्या काचेच्या बांगड्या,चुडा, जोडवी, नथ, पैंजण, कंबरपट्टा, कानातले (कर्णफुले), बाजूबंद, सिंदूर (कुंकू), बिंदी,टिकली, काजळ, मेहंदी, अत्तर, आरसा आणि फणी, काजळकुसरी,सुवासिक तेल यांचा समावेश असतो. यात काही साहित्य कमी किंवा जास्त केल्यास त्यानुसार ओटीच्या पॅकेजची किंमत घटते किंवा वाढते.

पॅकेजमध्ये साहित्य कमी, जास्त करता येते



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *