![]()
शेतामध्ये कष्ट करणाऱ्या पण ७/१२ वर नाव नसल्यामुळे शासकीय लाभांपासून वंचित राहिलेल्या राज्यातील लाखो कष्टकरी महिलांना आता “अधिकृत शेतकरी’ म्हणून कायदेशीर दर्जा मिळणार आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत कृषी विभागाने महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी विशेष ऑनलाइन पोर्टल सुरू केले असून, १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या महिनाभरात राज्यव्यापी सेवा संकल्प अभियान राबवले जात असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. शेतीत प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांचे योगदान अधोरेखित करून त्यांना सक्षम करण्याच्या दिशेने हा ऐतिहासिक टप्पा आहे. आता केवळ जमिनीची मालकी असण्याची अट संपुष्टात आली असून प्रत्यक्ष बांधावर राबणाऱ्या भूमिहीन, बटाईदार व शेतमजूर महिलांनाही कृषी कर्ज, पीक विमा आणि शासकीय योजनांचा थेट लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे,” असा विश्वास मंत्री भरणे यांनी व्यक्त केला.
Source link
7/12 वर नाव नसले तरीमहिलांना शेतकरी प्रमाणपत्र:राज्यभरात विशेष मोहीम राबवणार- मंत्री भरणे