![]()
महानगरपालिकेच्यावतीने ‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘स्वच्छता हीच सेवा’ या व्यापक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. रेसिडेन्शिअल हायस्कूल येथून १५०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागाने काढण्यात आलेल्या दोन किलोमीटर लांबीच्या स्वच्छता रॅलीने संपूर्ण शहराचे लक
.
यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती दिपाली बारस्कर, उपसभापती वर्षा सानप, नगरसेवक महेश लोंढे, डॉ. अमोल बागुल, गणेश लयचेट्टी, रेसिडेन्शिअल हायस्कूलचे प्राचार्य जाधव उपस्थित होते. खामकर उपस्थित होते.
शहरात महिनाभर राबवणार विविध उपक्रम या अभियानांतर्गत महिनाभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. सुरुवातीला शाळांमध्ये स्वच्छ पाठशाला उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना चार प्रकारच्या कचरा वर्गीकरणाचे धडे दिले जातील आणि कंपोस्ट प्लांटला अभ्यासभेटी आयोजित केल्या जातील. त्यानंतर शहरातील कचरा साचणारी ठिकाणे शोधून त्यांचे नकाशांकन केले जाईल आणि स्वच्छता करून त्या जागांचे सौंदर्यीकरण केले जाईल. बसस्थानक, रेल्वे परिसर, बाजारपेठा आणि उद्यानांमध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबवून व्यापाऱ्यांना प्लास्टिकमुक्त मोहिमेत सहभागी करुन घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.