![]()
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहिल्यानगर शहरात प्रथमच श्री छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री रामकृष्ण सेवा ट्रस्टच्या वतीने नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉन्स येथे २९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान हा सोहळा होणार आहे. अयोध्य
.
मंगळवारी (२९ सप्टेंबर) दुपारी ३ वाजता सोहळ्याचा शुभारंभ होईल. २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान दुपारी ३ ते सायंकाळी ७ आणि ३ ऑक्टोबरला सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत कथा होईल.
३ ऑक्टोबरला वैदिक पद्धतीने होणारा शिवराज्याभिषेक सोहळा विशेष आकर्षण ठरणार आहे. स्वागताध्यक्ष संजय जाधव असून मंचचे प्रायोजक शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन आहे. राज्याभिषेक सोहळ्याचे यजमानपद सुमित संतोष वर्मा भूषविणार आहेत. सोहळ्याच्या नियोजनासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून तयारीला वेग आला आहे. युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शिवचरित्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष नंदलाल मणियार व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
शिवचरित्रात पाच दिवस काय ऐकायला मिळेल? २९ सप्टेंबर : शिवजन्मपूर्व काळ, तत्कालीन परिस्थिती, शिवजन्म, स्वराज्याची शपथ व संतकार्य. ३० सप्टेंबर : कान्होजी जेधे, जावळीचा वेढा, प्रतापगडाची युद्धनीती आणि अफझलखान वध. १ ऑक्टोबर : पावनखिंडीतील शौर्य, चाकणचा रणसंग्राम, लाल महालावरील स्वारी, आरमार स्वारी, पुरंदरचा वेढा व तह. २ ऑक्टोबर : आग्र्याहून सुटका, छत्रसाल बुंदेला यांना प्रेरणा आणि तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा. ३ ऑक्टोबर : विजय पर्व, शिवराज्याभिषेक, स्वराज्याची स्थापना आणि हिंदवी स्वराज्याचा विस्तार.