Headlines

पालखी महामार्गावरील अतिक्रमण हटवले, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने कारवाई सुरू‎




सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्गालगतची अतिक्रमणे हटविण्याची मोहीम मोहोळ शहरात सुरू करण्यात आली आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पंढरपूर कार्यालयाच्या पथकाने मोहोळ पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने पंढरपूर पालखी महामार्ग अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. पंढरपूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या दक्षिणेकडील बाजूस ही कारवाई करण्यात आली.महामार्गालगत ड्रेनेजच्च एंड पॉइंटपासून दोन मीटर अंतरातील जागा तसेच युटिलिट झोनची जागा अतिक्रमणमुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.या जागेवर विविध प्रकारची बांधकामे व इतर अतिक्रमणे करण्यात आली होती.अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात संबंधित मालमत्ताधारकांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून यापूर्वी नोटिसा बजावण्या आल्या होत्या.नोटिसा देऊनही संबंधितांनी स्वतःहून अतिक्रमणे हटविली नाहीत.त्यामुळे प्राधिकरणाने थेट कारवाई करण्याचा निर्णय घेत पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या मदतीने अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पंढरपूर कार्यालयाचे पथक मोहोळमध्ये दाखल झाल्यानंतर कारवाईला सुरुवात झाली.महामार्गालगतची जागा मोकळी करून वाहतूक व सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेला परिसर खुला करण्यावर भर देण्यात आला. या कारवाईदरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पंढरपूर कार्यालयाचे अभियंता भोसले,मोहोळचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्यासह प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *