Headlines

135 कोटींचा घोटाळ, गजानन गंगामाई समूहावर ईडीचे छापे:सीबीआय-एसीबीच्या एफआयआरनंतर कारवाई; शेल कंपन्या अन् ‘राउंड ट्रिपिंग’द्वारे निधी लाटल्याचा ठपका



बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाची तब्बल १३५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने “गजानन गंगामाई इंडस्ट्रीज एलएलपी’ या उद्योग समूहावर आणि त्यांच्या भागीदारांवर धडक कारवाई केली आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये ईडीच्या मुंबई

.

पुणे सीबीआय – एसीबीने नोंदवलेल्या एफआयआर आणि न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारे ईडीने ही कारवाई सुरू केली. तपासादरम्यान इंडियन बँकेच्या सिंगापूर शाखेतील ३.७ दशलक्ष अमेरिकन डॉलर (सुमारे ३५.७१ कोटी रुपये) शिल्लक असलेले मुदत ठेव (एफडी) खाते ईडीने गोठवले आहे.

संस्थांची गुंतागुंत, रोख काढून निधीचा अपहार

ईडीच्या माहितीनुसार, गजानन गंगामाई इंडस्ट्रीजने बँकांच्या समूहाकडून कर्ज घेतले होते. हे कर्ज नंतर १३५ कोटी रुपयांच्या थकबाकीसह एनपीएमध्ये गेले. बँकांनी त्याला “फसवणूक’ म्हणून घोषित केले. भागीदार नितीन रामचंद्र जाधवसह ईतरांनी काही संस्थांच्या माध्यमातून “राउंड-ट्रिपिंग’ अन् निधीच्या अपहाराचे गुंतागुंतीचे जाळे विणल्याचे समोर आले.

दोन्ही जिल्ह्यांतील बड्या औद्योगिक घराण्यांशी नाते

गजानन गंगामाई उद्योग समूह हा संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अत्यंत प्रभावशाली समूह मानला जातो. या समूहाचे दोन्ही शहरांतील मातब्बर तसेच मोठ्या औद्योगिक, व्यावसायिक घराण्यांशी घट्ट संबंध आहेत. आर्थिक व्यवहारही आहेत. त्यामुळे ईडीने या समूहावर टाकलेल्या धाडींमुळे उद्योग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *