![]()
श्रीक्षेत्र राजूर येथील राजुरेश्वराचेभव्य मंदिरसंपूर्णमहाराष्ट्राचेवैभव आहे.४९ वर्षांपूर्वी,१९७७ मध्ये,या मंदिराच्यापुनर्विकासाचामुद्दा पुढे आला. १९८५ मध्ये प्रत्यक्षकाम सुरू झाले. आता ७७ वर्षांचेजालना शहरातील चंद्रप्रकाशमोतीलाल शर्मा हे या मंदिराचेवास्तुतज्ज्ञ तसेच प्रकल्पप्रमुख होते.मंदिराच्या उभारणीसंदर्भात त्यांनीदिलेली माहिती त्यांच्या शब्दांत. १९७७ मध्ये पुढे आली राजुरेश्वराचे मंदिर उभारण्याची संकल्पना, ४९ वर्षांच्या तपानंतर तयार झाले महाराष्ट्राचे वैभव ‘मी जालना शहरातील पहिला प्रॅक्टिसिंगइंजिनिअर. १९७७ मध्ये राजूर मंदिराच्या ट्रस्टींनीमंदिराचा पुनर्विकास करण्याचा निश्चय केला.त्यासाठी मला विचारणा झाली. मूळ मंदिर १२बाय १२ फुटांचे होते. ते हेमाडपंती पद्धतीचे,खणाचे होते. शिखर नव्हते. छतावर मातीचा ढीगहोता. मंदिराच्या विश्वस्तांना पूर्व बाजूने प्रवेशद्वारहवे होते. त्यावर शिखर करायचे होते. मी माझ्यापद्धतीने प्लॅन तयार करून दिला. १९८१ ला जालनाजिल्हा निर्मितीनंतर नानासाहेब पाटील हेजिल्हाधिकारी म्हणून आले. त्यांनी मला बोलावूनघेतले. कामाला वेग देण्याच्या सूचना दिल्या. मूळमूर्तीला अजिबात धक्का न लावता हे कामकरायचे, अशा सूचना प्रशासन व विश्वस्तांनीदिल्या होत्या. त्यानुसार मी काम सुरू केले. मूळमंदिराच्या समोर एक टेकडी होती. तेथे सभामंडपतयार करायचा होता. त्यासाठी आम्ही खोदकामसुरू केले. परंतु ती टेकडी नव्हती. तो चक्कमातीचा ढीग होता. त्यामुळे मजबूत पायामिळण्यासाठी आम्हाला तब्बल ३० फूट खालीजावे लागले. ३० फूट खाली जाऊन जर छोटेसेशिखर आणि अर्धमंडप उभारायचा असेल, तरकाय अर्थ? म्हणून मी नानासाहेब पाटील यांनासर्व माहिती दिली. मोठा प्लॅन तयार करण्याचाप्रस्ताव दिला. त्यांनीही तातडीने होकार दिला.त्यानुसार गाभारा, सभामंडप, समोर पायऱ्या,भव्य शिखर असा प्लॅन मी तयार केला. तेव्हाट्रस्टकडे १३ लाख रुपये होते. या कामाचेअंदाजपत्रक १ कोटी ६७ लाख रुपयांचे होते…। याप्लॅनचे काय होणार, याची सर्वांनाच चिंता होती,मात्र लोकवर्गणीतून पैसे येत गेले व काम होतगेले. शेवटीपावणेदोन कोटींचे मंदिर उभे राहिले.’ देवाच्या कृपेनेच १९९९मध्ये स्ट्रक्चरल वर्क पूर्ण कामाचा ठेका न देता लेबर कंत्राटद्यायचे. जसे पैसे येतील तसे मटेरियलपुरवायचे या अटींवर काम सुरू झाले.पुढे पैसे येत गेले. काम होत गेले. १९९२मध्ये जमिनीपासून ११० फूट उंचीचेभव्य शिखर तयार झाले. १९९५ लात्यावर पंचधातूचा भरीव कळसप्रतिष्ठापित केला. तेव्हा अनेकांनीआश्चर्य व्यक्त केले. १९९९ मध्येआम्ही सर्व स्ट्रक्चरल वर्क पूर्ण केले,असेवास्तुतज्ज्ञ चंद्रप्रकाश शर्मा यांनीसांगितले. देवाच्या कृपेनेच हे काम होतगेल्याचे ते म्हणाले.
Source link
13 लाख हाताशी, तरी वर्गणीतून उभे राहिले 2 कोटींचे मंदिर:श्रीक्षेत्र राजूर येथील राजुरेश्वर मंदिर उभारणीची रंजक कथा; वास्तुतज्ज्ञ चंद्रप्रकाश शर्मा यांच्याच शब्दांत…