![]()
सावंगी शिवारातील साई विश्वकल्याणी सोसायटीच्या पुलाजवळ महावितरण कंपनीच्या विद्युत पोलवरील ॲल्युमिनियमची तार चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरीला गेलेल्या तारांची एकूण किंमत सुमारे २६ हजार ६०० रुपये आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंगी शिवारात सुरेश भानुदास सांगळे व हरिदास रावसाहेब सांगळे (दोघेही रा. साताळा) यांनी संगनमत करून महावितरणच्या मालकीची तार चोरण्याचा प्रयत्न केला. आरोपी सुरेश सांगळे याने दोन पोलवरील सुमारे ३० किलो तार कापून जमा केली असताना तो रंगेहाथ आढळून आला. तर हरिदास सांगळे याने तीन पोलवरील अंदाजे ४० किलो तार कापून नेल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ लक्ष्मण हारी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून फुलंब्री पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमलदार गायकवाड या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
Source link
महावितरणची तार चोरी:फुलंब्री पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा