![]()
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात विकासाची गंगा पोहोचत असून, महिला सक्षमीकरण आणि ग्रामविकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाते. गावांच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्राकडून विविध योजना थेट पोहोचवल्या जात असून, पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी ग्रामविकासाच्या योजना राबविण्यावर भर देण्याचे आवाहन भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ. भारती पवार यांनी केले. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत तालुक्यातील मानूर गावातील नूतन ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला, त्याप्रसंगी डॉ. पवार बोलत होत्या. व्यासपीठावर आमदार नितीन पवार, शैलेश पवार, अॅड. संजय पवार, हेमंत बोरसे, भूषण पगार आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार नितीन पवार यांनी सांगितले की, ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि ग्रामस्थांना पारदर्शक व वेगवान प्रशासकीय सेवा मिळण्यासाठी आधुनिक सुविधांनी युक्त ग्रामपंचायत कार्यालय अत्यंत महत्त्वाचे ठरते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा वास्तू कणा ठरणार आहेत. यावेळी डॉ. रावसाहेब शिंदे, राजेंद्र पवार, योगेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. किशोर पवार यांनी प्रास्तविक केले. तुषार बोरसे यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच वैशाली चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी उपसरपंच कमलबाई पवार, सदस्य परशुराम पवार, साहेबराव पवार, नितीन पवार, गोरक्ष बोरसे, गजेंद्र पवार, ग्रामसेवक निर्मला खांडवी आदी उपस्थित होते.
Source link
ग्रामविकासाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवा:मानूर ग्रामपंचायतीत भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ. भारती पवार यांचे प्रतिपादन