Headlines

गल्लीबोळात घुमतोय 500 हून अधिक ‘रणरागिणीं’चा ढोल-ताशा:अहिल्यानगरातील 15 ते 20 पथकांत गृहिणी, डॉक्टर, इंजिनिअर, युवती-महिलांचा सहभाग‎‎




पाठीवर १५ ते १८ किलोचा ढोल, हातात लाकडी टिपरी, डोक्यावर ऐनदार फेटा आणि चेहऱ्यावर बाप्पाच्या भक्तीचे तेज… यंदाच्या गणेशोत्सवात अहिल्यानगरच्या रस्त्यांवर केवळ ढोल-ताशांचा गजरच नाही, तर बदलत्या स्त्रीशक्तीचा नवा अविष्कार पहायला मिळत आहे. शहरातील गल्लीबोळांतील सरावापासून ते मुख्य मिरवणुकांपर्यंत यंदा महिला आणि युवतींचा प्रभाव तब्बल ४० ते ५० टक्क्यांनी वाढला आहे. शहरातील १५ ते २० ढोल पथकांमध्ये ५०० हून अधिक रणरागिणी सहभागी आहेत. घराची चौकट, नोकरीची जबाबदारी आणि अभ्यासाचे गणित सांभाळत नगरच्या रणरागिणींनी तालबद्ध वादनात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावला आहे. किचन आणि कॉर्पोरेट ते थेट सरावाचे मैदान केवळ शाळा-कॉलेजच्या विद्यार्थिनीच नाहीत, तर ३५ ते ४५ वयोगटातील गृहिणी, शिक्षिका, डॉक्टर आणि वर्क-फ्रम-होम करणाऱ्या आयटी इंजिनिअर्स महिला रोज रात्री २ ते ३ तास सरावासाठी मैदानात उतरत आहेत. दिवसभराचा थकवा विसरून तालावर थिरकणारी टिपरी आणि ढोलाचा ठोका नगरकरांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रमुख ढोल-ताशा पथकांमध्ये केवळ वादक म्हणूनच नाही, तर ट्रस्ट बोर्ड, आर्थिक नियोजन, शिस्त समिती आणि मुख्य ताल धरणाऱ्या ट्रॅक वादक म्हणून युवतींनी नेतृत्व स्वीकारले आहे. आरोग्य आणि संस्कृतीचा संगम सलग २ ते ३ तास १५ किलोचा ढोल पेलण्यासाठी महिलांनी गेल्या महिन्याभरापासून विशेष फिटनेस आणि तोल सांभाळण्याच्या प्रशिक्षणावर भर दिला आहे. ‘ती’चा वाढता सहभाग ५००+ : यंदाच्या गणेशोत्सवात वादनात नगरच्या युवती व महिला. ४०% : प्रमुख पथकांमधील महिला वादकांची सरासरी टक्केवारी. १४ ते ४८ : ढोल-ताशा पथकात सहभागी महिलांचा वयोगट. १५-१८ किलो : ढोलाचे सरासरी वजन, जे महिला लीलया पेलत आहेत. ही केवळ कला नाही, तर ‘थेरपी’ ^ स्वयंपाकघर आणि मुलांचा अभ्यास,नंतर ढोल वाजवताना संपूर्ण दिवसाचा ताण निघून जातो. बाप्पाची सेवा करण्यासोबतच यामुळे मिळणारा आत्मविश्वास वेगळाच असतो. मागील वर्षी मॉरिशसमध्ये ढोल वादनाचा अनुभव अभिमानास्पद होता. – दीपाली चोपडा, गृहिणी व वादक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *