Headlines

सातारा गुन्हेगारी वार्ता:अजिंक्यतारा किल्ल्यावर रात्री एकावर हल्ला; सोनसाखळी, रोकड-मोबाईल लुटला




सातारा शहरातील अजिंक्यतारा किल्ला परिसरात रात्री फिरण्यासाठी गेलेल्या युवकाला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडवून दगडाने मारहाण केली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत सोनसाखळी, रोकड आणि मोबाईल असा ऐवज लुटून नेल्याची घटना रात्री घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. महेश गोंदकर (रा. प्रतापगंज पेठ) रात्री नऊच्या सुमारास किल्ला परिसरात फिरत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या परिसरात चकरा मारल्या. गोंदकर फोनवर बोलत असताना एकाने पाठीवर हाताने मारले. त्यांनी मागे वळताच दुसऱ्याने डोळ्यावर दगड मारला. त्यानंतर दोघांनी मारहाण करून त्यांना खाली पाडले. चोरट्यांनी त्यांच्या खिशातील १२ हजार ३०० रुपये आणि गळ्यातील एक तोळ्याची सोनसाखळी हिसकावली. पळून जाताना खाली पडलेला मोबाईलही घेऊन ते पसार झाले. दुचाकीचा क्रमांक झाकलेला असल्याने तो समजू शकला नाही. जखमी गोंदकर यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे तपास करीत आहेत. बाहेर येण्यास नकार दिला म्हणून युवतीचा छळ; बनावट अकाउंटवर अश्लील फोटो सोबत बाहेर येण्यास नकार दिल्याच्या रागातून युवतीला धमकावून तिची समाजमाध्यमांवर बदनामी काकेल्याचा प्रकार सातारा शहरात उघडकीस आला आहे. युवतीच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट तयार करून त्यावर अश्लील फोटो प्रसारित केल्याप्रकरणी किरण घाडगे (रा. मलकापूर, कऱ्हाड) याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, संशयिताने युवतीशी संपर्क साधून तिला आपल्यासोबत बाहेर येण्यास सांगितले. मात्र, युवतीने त्यास नकार दिला. त्यानंतर संशयिताने फोन करून तिच्या आई-वडिलांसह भावाला मारहाण करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. धमकीनंतरही प्रकार थांबला नाही. संशयिताने युवतीच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट सुरू केले. या अकाउंटवर अश्लील फोटो प्रसारित करून तिची बदनामी करण्यात आली. त्यामुळे युवतीने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक शेवाळे तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *