Headlines

सियाने लाथ मारली, तर चेतन ने केतन अग्रवालला दरीत ढकलले:केतन अग्रवाल हत्येप्रकरणी 5,053 पानांचे आराेपपत्र




केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलिसांच्या ५०५३ पानांच्या दोषारोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिया व चेतन यांनी खुनाचा कटच रचला नाही, तर प्रत्यक्ष खुनाचा सराव करून केतनला लोहगडावर दरीत ढकलून दिले. १८ जून रोजी झालेल्या या खुनाचा कट आरोपींनी २५ मे रोजीच रचला होता. त्यांनी लोहगडावर जाऊन ढकलण्याची जागाही निश्चित केली होती. ४ जून रोजी सियाने केतनला किल्ल्यावर नेऊन दरीत ढकलण्याचा पहिला प्रयत्न केला. मात्र, एका झाडामुळे केतन बचावला. तेव्हा ‘साप आल्याने मी अंगावर पडले’, असे सांगून सियाने त्याची दिशाभूल केली. नंतर रितेश हंगे याच्या सल्ल्यानुसार त्यांनी पुण्यातील ‘एरिया ३७’ मध्ये खुनाचा सराव केला. १७ जून रोजी उल्हासनगर येथील एका कॅफेत भेटून खुनाची अंतिम रणनीती ठरवली. लेस बांधण्याचा इशारा, चेतनला बोलावले घटनेवेळी (१८ जून) सियाने घटनास्थळी पोहोचल्यावर बुटाची लेस बांधण्याचा इशारा करत पाठलाग करणाऱ्या चेतनला बोलावून घेतले. ठरल्याप्रमाणे सियाने पायावर लाथ मारून त्याला अस्थिर केले आणि पाय हवेत राहतील याची दक्षता घेतली. त्याच क्षणी चेतनने तात्काळ त्याला दरीच्या दिशेने ढकलून दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *