![]()
सामाजिक बांधिलकी जपत येथील राजमुद्रा फ्रेंड सर्कल, सोमवार पेठ यांच्या वतीने रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ५० नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. उपक्रमाचे उद्घाटन उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या
.
रक्तदान उपक्रमासाठी सचिन धाडीवाल, जैनम जीविका फाउंडेशन, नयन जैन, कल्पना सोनवणे तसेच अर्पण ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमात स्वाती शरणागत, वनीता आहड, नेहा कोल्हटकर, साक्षी मनगटे व केतकी दुसाने यांनी सक्रिय सहभाग घेतला. आरोग्य तपासणी शिबिरासाठी श्री नेमिनाथ जैन संस्थेचे ट्रस्ट अध्यक्ष बेबीलाल संचेती, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, मेडिकल विभागाचे नंदकुमार ब्रम्हेचा, सुमती सुराणा, डॉ. आकाश जैन, सुनील बागरेचा, पंकज चोपडा, विवेक जैन, प्राचार्य डॉ. अजय दहाड, वैद्यकीय अधीक्षक सुनील जांगडा, शिबिर प्रमुख डॉ. मनोज छाजेड, आरोग्य विभागप्रमुख डॉ. मोनाली पवार यांनी सहकार्य केले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजमुद्रा फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष सम्यक डुंगरवाल, कार्याध्यक्ष रोनक तिलोडा, उपाध्यक्ष पार्थ श्रीश्रीमाळ, हर्षल संचेती, संस्थापक यश डुंगरवाल, रोहन तिल्लोडा यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास परिसरातील नागरिक उपस्थित होते.
आरोग्य तपासणीला नागरिकांचा प्रतिसाद आरोग्य तपासणी शिबिरात ६७ नागरिकांनी सहभाग घेतला. विविध आजारांची तपासणी करून तज्ज्ञांकडून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन देण्यात आले. नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.