![]()
सफाई कामगारांची संख्या पूर्वीइतकीच; मात्र कामाचे नियोजन बदलले आणि राहाता शहराच्या स्वच्छतेचे चित्र बदलू लागले. विशेषतः उपनगर आणि वाड्या-वस्त्यांमध्ये या बदलाचा परिणाम जाणवू लागला आहे. गुरुवारचा आठवडे बाजार संपल्यानंतर अवघ्या दोन तासांत बाजारतळ स्वच्छ
.
नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी सांगितले की, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या कामकाजाचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम शहराच्या स्वच्छतेवर दिसत आहे.
कचऱ्याचे ढिग करण्याऐवजी थेट संकलन नगरपरिषदेकडून नव्याने १६ ढकलगाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यापूर्वी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिग करून त्यानंतर तो ट्रॅक्टरमध्ये भरला जात होता. आता १६ महिला सफाई कर्मचारी प्रत्येकी एक ढकलगाडी घेऊन परिसराची स्वच्छता करतात.
ढकलगाडीतील दोन्ही कचराकुंड्या भरल्यानंतर घंटागाडीच्या माध्यमातून कचरा उचलला जातो. त्यामुळे रस्त्यांवर कचऱ्याचे ढिग साचण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
पूल ते उपनगरांपर्यंत स्वच्छतेला प्राधान्य कातनाल्यावरील पुलाची नियमित स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर वाड्या-वस्त्या आणि उपनगरांमध्येही स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. परिणामी शहराचा चेहरामोहरा बदलताना दिसत असून, सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. ही व्यवस्था सातत्याने सुरू राहिल्यास शहरवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.