![]()
केतन अग्रवाल खून प्रकरणाच्या तपासात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या कथित गुप्त विवाहाचा मुद्दाही पोलिसांच्या तपासाच्या केंद्रस्थानी होता. डिसेंबर 2025 मध्ये दोघे काही मित्रांसोबत राजस्थानला गेले होते. त्या वेळी त्यांनी खाटूश्याम मंदिरात लग्न केल्याचा संशय पोलिसांना त्यांच्या मोबाइलमधील संभाषणाच्या विश्लेषणातून आला. तपासात पोलिसांना सिया आणि चेतनचा एक फोटो सापडला आहे. यात सियाच्या भांगेत सिंदूर असून चेतनच्या गळ्यात फुलांचा हार दिसत आहे. हा फोटो आरोपींच्या मोबाइलमधून मिळाला. पोलिसांनी तो छायाचित्र पुरावा म्हणून दोषारोपपत्रासोबत न्यायालयात सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पासपोर्ट फाडल्याचेही स्पष्ट 6 जून रोजी केतन आणि सिया बाली येथे प्री-वेडिंग शूटसाठी जाणार होते. मुंबई विमानतळाकडे जात असताना द्रुतगती महामार्गावरील फूड मॉलमध्ये सियाने केतनचा पासपोर्ट फाडला. त्यामुळे बाली दौरा रद्द झाला. यानंतर 14 जून रोजी सियाने हट्ट करून केतनला लोहगडावर नेले. तेथे त्याला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. खून करून ‘मिसळ’ खाल्ली केतनचा मृत्यू झाल्यानंतर किल्ल्यावरून खाली आल्यानंतर चेतन दुचाकीने जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगतच्या एका हॉटेलमध्ये मिसळ खाण्यासाठी गेला. याच हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो पोलिसांना स्पष्टपणे दिसून आला. किल्ल्यावरचे आणि त्यानंतरचे फुटेज एकत्र तपासताना पोलिसांना त्याच्या हालचालींची साखळी जोडता आली. सिया आणि चेतनमध्ये ऑक्टोबर 2025 पासून होती जवळीक तपासानुसार सिया आणि चेतन यांच्यात ऑक्टोबर 2025 पासून जवळीक निर्माण झाली. कुटुंबीयांचा या संबंधांना विरोध असल्याची माहितीही चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. डिसेंबरमध्ये दोघेही काही मित्रांसोबत राजस्थानला गेले होते. पुण्यातून विमानाने जाण्याचे नियोजन होते; मात्र विमानसेवा रद्द झाल्याने त्यांनी रेल्वेने राजस्थान गाठले आणि परतले. 18 जून रोजी सियासोबत चेतनही लोहगडावर गेला होता 18 जून रोजी सियासोबत चेतनही लोहगडावर गेला. दोघांनी मिळून केतनला सुमारे 400 फूट खोल दरीत ढकलले. किल्ल्यावर जाताना चेतनने उन्हाळ्यात हुडी घातली होती. टोपीवर मोठे हेडफोन लावले होते. स्वतःची ओळख पटू नये म्हणून त्याने किल्ल्यावर पोहोचल्यानंतर हुडी काढून बॅगेत ठेवली.
Source link
केतन अग्रवाल खून:सियाचा सिंदूर अन् चेतनने गळ्यामध्ये हार घातल्याचा फोटो दोषारोपपत्रात, मोबाइलमधील संभाषण आणि फोटोमुळे गुप्त विवाहाचा संशय