Headlines

पत्नीची हत्या केल्यानंतर इंजिनिअरने स्वतःवर वार करत गॅलरीतून मारली उडी:देहूगावात कौटुंबिक वादाचा थरार, वर्षभराच्या वादाचा अखेर रक्तरंजित अंत




पिंपरी-चिंचवडजवळील देहूगाव परिसरात रविवारी सकाळी कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना घडली. एका आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या तरुणाने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. पत्नीवर हल्ला केल्यानंतर त्याने स्वतःवरही वार केले आणि त्यानंतर घराच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी (20 सप्टेंबर) सकाळी सुमारे पावणेसहाच्या सुमारास देहूगावातील ओमकार सोसायटीमध्ये घडली. या घटनेत शुभांगी आकाश बारस्कर (वय 28) यांचा मृत्यू झाला. तर त्यांचे पती आकाश रामदास बारस्कर (वय 26) हे गंभीर जखमी झाले आहेत. गस्तीवरील पोलिसांना मिळाली माहिती रविवारी सकाळी देहूरोड पोलिसांचे पथक परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी ओमकार सोसायटीजवळ एका व्यक्तीला मारहाण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना इमारतीच्या खाली आकाश हा गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याच्या शरीरावर जखमा होत्या. त्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास करत घराची पाहणी केली. दुसऱ्या मजल्यावरील घरात शुभांगी गंभीर अवस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी शुभांगी यांना मृत घोषित केले. लग्नानंतर काही काळापासून कौटुंबिक वाद पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, आकाश हा आयटी इंजिनिअर असून हिंजवडी परिसरातील एका नामांकित आयटी पार्कमधील कंपनीत काम करत होता. शुभांगी यादेखील खासगी कंपनीत नोकरी करत होत्या. दोघांचा विवाह डिसेंबर 2023 मध्ये झाला होता. विवाहानंतर काही काळाने दोघांमध्ये कौटुंबिक कारणांवरून वाद सुरू झाले होते. गेल्या वर्षभरापासून त्यांच्या वैवाहिक जीवनात मतभेद असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून हे दाम्पत्य देहूगावातील ओमकार सोसायटीमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. सकाळच्या वादानंतर टोकाचे पाऊल रविवारी सकाळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. याच वादातून आकाशने पत्नी शुभांगी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा पोलिसांना संशय आहे. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. यानंतर आकाशने स्वतःवरही शस्त्राने वार केल्याचे समोर आले. त्यानंतर त्याने घराच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उडी मारली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास शुभांगी यांच्या मृतदेहाचे पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दुसरीकडे, गंभीर जखमी असलेल्या आकाशवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमागे नेमका कोणता कौटुंबिक वाद होता, हल्ल्यापूर्वी दोघांमध्ये नेमके काय घडले आणि घटनेत वापरलेल्या शस्त्राबाबत अधिक माहिती काय आहे, याचा तपास देहूरोड पोलिसांकडून सुरू आहे. आकाशची प्रकृती सुधारल्यानंतर त्याच्याकडून घटनेबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. हेही वाचा… ऑनलाइन गेमचा नाद पडला भारी!:तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अपहरण, उत्तर प्रदेशात नेत केले अत्याचार ऑनलाइन गेमच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तींशी वाढणारी जवळीक अल्पवयीन मुलांसाठी किती धोकादायक ठरू शकते, याची प्रचिती देणारी एक धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. ‘फ्री फायर’ या मोबाईल गेमच्या माध्यमातून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि फूस लावून उत्तर प्रदेशात पळवून नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे कारवाई करत मुलीची सुखरूप सुटका केली असून, सुरजकुमार राजपूत या आरोपीला अटक करून त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *