Headlines

लाखमोलाच्या केळी बागांना तीव्र‎उष्णतेपासून वाचवण्यासाठी धडपड‎:बागेच्या चहूबाजूंनी ग्रीननेट, साड्या लावून उष्ण वाऱ्यांना करतात अटकाव



तांदलवाडी परिसरात केळी हे मुख्य पीक आहे. त्यामुळे वर्षभर निर्यातक्षम उत्पादनावर शेतकऱ्यांवर भर असतो. मात्र, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच उष्णता वाढून तापमान चाळिशीपार गेले आहे. यामुळे केळीचे पीक जोपासताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. उष्णतेचा कापणी

.

तापमान वाढीमुळे केळी झाडाची पाने कोरडी पडणे, घड निसटणे, पाने करपणे, प्रखर सूर्यकिरणांमुळे घड खराब होऊन काळे पडणे, पिकाची वाढ खुंटणे असे प्रकार होतात. यंदा एप्रिलपासून तापमान चाळिशीपार गेले. आताही एप्रिलमध्ये तापमानाचे चटके सहन करावे लागत आहेत. पुढेही मे हीटचा तडाखा सहन करावा लागेल. यामुळे केळी पीक वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत.

बागेत उष्ण हवा जाऊ नये म्हणून बांधावर साडी किंवा हिरव्या नेटचा वापर करून बागेच्या चारही सीमा बंद करणे, धैंचा, निरगुड, नेपियर गवत (हत्ती गवत) व गुरांचा घास आडोसा म्हणून लावणे, केळीची पत्ती वापरून घड झाकणे, घडांसाठी स्कर्टिंग बॅगचा वापर करताना दिसतात.

परिसरात पूर्वी मृग बाग आणि कांदेबाग अशी केळी लागवड व्हायची. मात्र, आता वर्षभर लागवड आणि उत्पादनामुळे केळीला वर्षभर बाजारपेठ मिळते. यामुळे मागील वर्षी जूनमध्ये केळी लागवड झालेल्या बागा आता निसवणीवर तर काही परिपक्व होत आहेत. त्यांना उन्हाची झळ बसू नये म्हणून तांदलवाडी, बलवाडी, मांगलवाडी, दसनूर, सिंगत, सुनोदा, उधळी परिसरातील शेतकरी जिवापाड मेहनत घेतांना दिसत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *