Headlines

पुण्यात 2‘सीएं’नी बनावट आयकर प्रमाणपत्रे बनवून 4,427कोटी रुपये परदेशात पाठवले:बनावट 15 सीबी, 15 सीए प्रमाणपत्रांद्वारे शेल कंपन्यांचा वापर, गुन्हा दाखल



शेल कंपन्यांच्या माध्यमातून बनावट कागदपत्रे आणि ऑडिट अहवाल तयार करून तब्बल ४ हजार ४२७ कोटी ९२ लाख ४४ हजार ४०८ रुपये परदेशात पाठवत आयकर चुकवल्याचा मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन चार्टर्ड अकाउंटंट्सवर (सीए) येवलेवाडी पोलिस ठाण्यात गुन्ह

.

अंकुशकुमार सुरेशचंद बगरेचा (३४, रा. आचलनगर, कोंढवा) आणि मोहित शिवकुमार तोडी (३३, रा. कोंढवा बुद्रुक) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी तन्मयी सुहास देसाई (३१, रा. निगडी प्राधिकरण) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार भारतीय न्याय संहितेतील कलम ३१८(४), २३४, २२९ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ‘एम.एस. ओडी अँड असोसिएट्स’ या फर्मच्या माध्यमातून साथीदारांच्या मदतीने हा गैरव्यवहार केला. शेल कंपन्यांच्या व्यवहारांची कोणतीही पडताळणी न करता परदेशात पैसे पाठवण्यासाठी फॉर्म १५सीबीचे बनावट प्रमाणपत्र तयार करण्यात आले व ते खरे असल्याचे भासवून आयकर विभागाकडे सादर करण्यात आले. महिनाभरापूर्वीच्या उदगीर-पुणे सीए घोटाळ्याच्या धर्तीवरच हा घोटाळा असल्याचे दिसून येत आहे.

तीन कंपन्यांना आर्थिक फायदा

फॉर्म १५सीए तयार करण्याचा अधिकार नसतानाही तो बनवून आयकर विभागाच्या पोर्टलवर अपलोड केल्याचा आरोप आहे. याच बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन कंपन्यांना मोठा आर्थिक फायदा करून देण्यात आला. २०२२ ते २०२६ दरम्यान याच तीन कंपन्यांद्वारे ४ हजार ४२७ कोटी ९२ लाखांहून अधिक रक्कम परदेशात पाठवून कर चुकवण्यात आला. रकमेचा नेमका स्रोत आणि करचुकवेगिरीची व्याप्ती तपासानंतरच स्पष्ट होईल.

बँक व्यवहारांसह परदेशातील व्यवहारांची तपासणी

या प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. परदेशात पाठवण्यात आलेल्या रकमेचा मूळ स्रोत, संबंधित बँक खाती, व्यवहारांची साखळी आणि पैसा कोणत्या देशांत गेला, याची माहिती घेतली जात आहे. तसेच, संबंधित तीन कंपन्यांचे संचालक व इतर व्यक्तींची भूमिका तपासली जात असून यातून सरकारचा एकूण किती महसूल बुडाला, याचाही शोध घेतला जात आहे.

उदगीरमधील घोटाळ्याची पुण्यामध्ये पुनरावृत्ती

बरोबर एक महिन्यापूर्वी २४ ऑगस्ट २०२६ रोजी लातूरच्या उदगीरमध्ये सीए श्याम शिवप्रसाद कलानी याला अटक करण्यात आली होती. त्यानेही २०२२ ते २०२६ या काळात तब्बल १ हजार ८१० बनावट ‘फॉर्म १५-CB’ प्रमाणपत्रांच्या आधारे १६ संस्थांमार्फत २ हजार १४३ कोटी रुपये परदेशात पाठवले होते. या आरोपी सीएचे मुख्य कार्यालयही पुण्यातच होते, ज्यामुळे या दोन्ही घटना एकाच मोठ्या रॅकेटचा भाग असू शकतात, असा संशय आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *