Headlines

फुलंब्रीत महायुतीत ठिणगी:गुंठेवारीवरून भाजप-शिंदेसेनेत जुंपली; ठराव स्थगितीविरोध गेला न्यायालयात, खंडपीठाने जिल्हाधिकारी, नगरपंचायत सीओंना दिली नोटीस



फुलंब्री नगरपंचायतीच्या गुंठेवारी नियमितीकरणाच्या ठरावाला जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिल्यानंतर आता हा वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पोहोचला आहे. महाराष्ट्र नगर परिषद कायद्याच्या कलम ३०८ नुसार खासगी व्यक्तीच्या अर्जावरून असा ठराव रोखण

.

न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठाने यावर दोन आठवड्यांत म्हणणे मांडण्याचे आदेश दिले. वरकरणी प्रशासकीय वाटणाऱ्या या वादामागे मात्र फुलंब्रीत सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील राजकीय वर्चस्वाची मोठी लढाई असल्याचे समोर आले आहे. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी फुलंब्री नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत ठराव क्र. १६ मंजूर करण्यात आला. यात गट क्र. १७/१ मधील भूखंड वगळून उर्वरित हद्दीतील पात्र भूखंडांचे गुंठेवारीनुसार नियमितीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांच्या नावाशी संबंधित असलेल्या ‘अनुराधा चव्हाण सहकारी गृहनिर्माण संस्थे’च्या वतीने रोहिणी पाथरीकर यांनी याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी ठराव क्र. १६ ला स्थगिती दिली.

कलम ३०८ चा गैरवापर झाला का ?

ॲड. रवींद्र गोरे यांनी असा जोरदार युक्तिवाद केला की, महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमाच्या कलम ३०८ नुसार केवळ ‘मुख्याधिकाऱ्यांच्या’ अधिकृत अहवालावरूनच जिल्हाधिकारी ठराव रोखू शकतात. कोणत्याही तिसऱ्या खासगी व्यक्तीच्या अर्जावरून लोकप्रतिनिधींनी मंजूर केलेला ठराव स्थगित करणे कायद्याला धरून नाही.

भूखंड गुंठेवारी नियमितीकरणावरून वाद पेटला

शेकडो प्लॉटधारकांचे नियमितीकरण टांगणीला

गट क्र. १७/१ मधील अंतर्गत राजकीय श्रेयवादाच्या आणि वर्चस्वाच्या लढाईमुळे आता संपूर्ण नगरपंचायत हद्दीतील ठराव स्थगित झाला आहे. परिणामी, नियमितीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या फुलंब्रीतील सर्वसामान्य नागरिकांची गुंठेवारी प्रशासकीय व न्यायालयीन कचाट्यात अडकली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. रवींद्र गोरे यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. शरयू धंतुरे, ॲड. विजया पाथरीकर, ॲड. आदिल शेख व ॲड. शुभम शिंदे यांनी सहकार्य केले. राज्य शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंग गिरासे यांनी काम पाहिले. पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर होणार आहे.

युतीतील स्वकीयांसोबतच वर्चस्वाची लढाई

भाजप आणि शिंदेसेनेतील वर्चस्वाच्या राजकारणातून उद्भवलेला हा प्रकार आहे. राजकीय वर्चस्वाच्या लढाईत सामान्य नागरिकांना याची झळ सोसावी लागत असल्याची चर्चा आहे.

भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट)

नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी नगरपंचायतीत भाजपच्या सुहास शिरसाट यांच्या पॅनलचा पराभव केला होता. ठोंबरे मूळचे ठाकरे गटातून निवडून आले असले तरी नंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. दुसरीकडे, स्थानिक भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांच्या संस्थेचा गट क्र. १७/१ वगळल्याने भाजप विरुद्ध शिंदे गट असा महायुतीतील अंतर्गत संघर्ष उफाळून आल्याने फुलंब्रीतील राजकारण पुन्हा ढवळून निघाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *