![]()
गणेशोत्सव व आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरात भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाचा अन्नपदार्थांची अवैध वाहतूक समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने रविवारी (२० सप्टेंबर) संध्याकाळी शहानूरमियाँ दर्गा चौक, डी-मार्टजवळील ट्रॅव्हल्स पार्किंग परिसरात सुमारे ४,७६
.
दोन ट्रॅव्हल्सवर छापे, ३.६९ टन साठा सील :
पहिल्या कारवाईत : नीलकंठ ट्रॅव्हल्स (बस क्र. एआर ०१ एआर ५१३५): अहमदाबादहून आलेल्या या बसमधून ३ लाख ५५ हजारांचा २,०७९ किलो संशयास्पद साठा जप्त करण्यात आला.
रिच स्विट डिलाइट : गोड केलेले घट्ट दुधासारखे कृत्रिम मिश्रण (राधे) आणि गोड हलवा (राधे) जप्त करण्यात आले आहे. त्याच नीलकंठ ट्रॅव्हल्सच्या बसमधून आणखी एक संशयास्पद साठा विक्रीसाठी आणल्याचे उघडकीस आले. या कारवाईत १ लाख ६७ हजारांचा १,०७४ किलो साठा जप्त करण्यात आला.
यात डिलिशिअस स्विट (कृष्णा) : १४८ किलोग्रॅम (किंमत: २५,९१२), इंडियन स्विट्स (व्रज): १४८ किलोग्रॅम (किंमत : २४,८००), स्वीट, अ ट्रेडिशनल टेस्ट (श्री गोवर्धन गोल्ड): १४८ किलोग्रॅम (किंमत: २०,७२०), इंडियन डिलाइट घट्ट दुधासारखे कृत्रिम मिश्रण (डिलिशिअस रिलाइट): ५१४ किलोग्रॅम (किंमत: ६१,३३४), डिलाइट स्वाद असलेले धान्य व स्टार्चयुक्त मिठाई (डिलिशिअस डिलाइट): १८७ किलोग्रॅम (किंमत: ३२,७२५), गोड हलवा, खवा आधारित मिठाई (श्रीराम): २५ किलोग्रॅम (किंमत: ४,३७५) यांचा समावेश आहे.
दुसऱ्या कारवाईत : वीर ट्रॅव्हल्समधून (बस क्र. एआर ०२ सी ७८७८): १,६१२ किलो साठा (किंमत २,४९,२३६) जप्त झाला. यात प्रीमियम डेझर्ट (नंदेश्वर), गोड हलवा (नंदेश्वर), रिच स्विट डिलाइट (ब्रजवासी) आणि पारंपरिक मिठाई (गोकुळ) जप्त करण्यात आले.
प्रयोगशाळेला नमुने पाठवले; दोषींवर कडक कारवाईचा इशारा : अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे यांनी जप्त केलेल्या सर्व अन्नपदार्थांचे कायदेशीर नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेतले असून ते प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
संशय आल्यास ताबडतोब तक्रार करा
1 विश्वासू नामांकित मिठाईच्या दुकानांकडूनच खवा किंवा मिठाई खरेदी करा. अनोळखी किंवा नवीन स्टॉल्सवरून उघड्यावर मिळणारे पदार्थ टाळा. 2 खूपच कमी किंमतीत मिळणारी मिठाई किंवा खवा खरेदी टाळा. कारण यात भेसळीची अधिक शक्यता. 3 मिठाईचा पोत जास्त रबरासारखा, चिकट किंवा चव स्टार्चसारखी वाटल्यास ती खाणे टाळा. 4 तुमच्या परिसरात कुठेही असा संशयास्पद, निकृष्ट किंवा बेकायदेशीर अन्नाचा साठा आढळल्यास तात्काळ ‘एफडीए’शी संपर्क साधा. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सुरक्षित गोड पदार्थ खाण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी खालील गोष्टींची खबरदारी घ्या: