Headlines

कर्णकर्कश डीजे, ध्वनिप्रदूषणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाची सुमोटो याचिका:आज सुनावणी, उत्सवाच्या नाही तर ध्वनिप्रदूषणाच्या विरोधात- खंडपीठ




गणेशोत्सवासह उत्सव काळात होणाऱ्या तीव्र ध्वनिप्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी स्वतःहून (सुमोटो) दखल घेतली. आम्ही कोणत्याही धर्माच्या किंवा उत्सवाच्या विरोधात नसून केवळ ध्वनिप्रदूषणाच्या समस्येविरोधात आहोत, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने उत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान डीजे, साउंड सिस्टीम आणि ध्वनिक्षेपकांच्या वापरामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर तीव्र चिंता व्यक्त केली. ‘आम्ही कोणत्याही धर्माच्या किंवा सणाच्या विरोधात नाही. मात्र, उत्सव साजरा करताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या प्रकरणी पुढील सुनावणी मंगळवार,२२ सप्टेंबर रोजी ठेवली आहे. न्यायालयाने राज्याचे महाधिवक्ता मिलिंद साठे यांना ध्वनिप्रदूषणाशी संबंधित नियमांची माहिती देण्याचे निर्देश दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *