![]()
वेरूळ येथील जगप्रसिद्ध घृष्णेश्वर मंदिर विकास आराखड्याच्या कामाला गती मिळाली आहे. आगामी नाशिक कुंभमेळ्यापूर्वी हा २१० कोटी रुपयांचा प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. २० एकर परिसरात भाविकांसाठी ३३ प्रकारच्या सुविधा उभारल्या जात आहेत. भाविक
.
सध्या गर्दीच्या काळात भाविकांना ऊन-पावसात दीड ते दोन तास रांगेत उभे राहावे लागते. या नव्या दर्शनबारीमुळे दर्शनाचा वेळ अवघ्या ३० मिनिटांवर येणार आहे. भाविकांची अडवणूक करणाऱ्या दलालांच्या गैरप्रकारांनाही आळा बसेल. या मार्गाच्या कामासाठी रस्त्यावरील सुमारे ३० दुकाने हटवण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी विनय गौडा दर आठवड्याला या कामाचा प्रत्यक्ष आढावा घेत विविध बाबींची पाहणी सुरू आहे.
रस्त्याखाली प्री-कास्ट काँक्रीट बॉक्स बसवणार
कन्नड रस्त्याखाली शास्त्रोक्त खोदकाम करून प्री-कास्ट काँक्रीट बॉक्स बसवले जातील. त्यामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवूनही भाविकांना सुरक्षितपणे ये-जा करता येईल. पुढील दोन महिन्यांत दर्शनबारी, व्यापारी संकुलसह भक्तनिवासचे काम पूर्ण होणार आहे.
ना-हरकत मिळाले
पुरातत्त्व विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. आता तातडीने काम सुरू करून पुढील दोन महिन्यांत भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्याचे आमचे नियोजन आहे. – स्मिता पवार, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (पश्चिम)