Headlines

गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी 15 हजारांची शिष्यवृत्ती:मानूरला स्व. कृष्णाजी कान्हुजी पवार वाचनालयातर्फे दहावी-बारावीतील मुला-मुलींचा गौरव‎



मानूर येथील स्व. कृष्णाजी कान्हुजी पवार सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. स्व. डॉ. अमृतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष श

.

अध्यक्ष ॲड. संजय पवार म्हणाले की, दहावी-बारावीच्या परीक्षेत प्रथम येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना वाचनालयाकडून शिष्यवृत्ती देण्याची संकल्पना ही सर्वांना प्रेरणा देणारी आहे. या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी थोडासा आधार मिळेल असा विश्वास वाटतो. अनुदानाच्या कमतरतेने आणि खर्चामुळे बहुतांश वाचनालये बंद पडत आहेत; अशा स्थितीत मानूर वाचनालयाने दहावी-बारावीत प्रथम आलेल्या मुला-मुलींना प्रत्येकी १५ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याचा उपक्रम गेल्या १० वर्षांपासून अखंड सुरू ठेवला आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले. यावेळी डॉ. समीर पवार यांनी प्रत्येक महिन्यात शेतकरी आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले.

व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्य परशुराम पवार, डॉ. समीर पवार, रघुनाथ पवार, जयवंत पवार, संभाजी पवार, बाळासाहेब बोरसे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. रवींद्र पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर ग्रंथपाल अक्षय पाटोळे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

शिष्यवृत्तीचे मानकरी लक्ष्मीबाई पवार शिष्यवृत्ती – लावण्या आहेर, कृष्णाजी पवार शिष्यवृत्ती – शैलेश गांगुर्डे, आप्पासाहेब शिष्यवृत्ती – साक्षी पवार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *