Headlines

Vijay Vadettiwar Attacks BJP Over Rahul Gandhi & Maharashtra Drought Crisis


भाजपचे नेते आता राहुल गांधींना मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे घाबरले आहेत. त्यांची राजकीय उंची कमी असताना सुद्धा काही जण राहुल गांधी यांच्यावर टीका करतात. त्यांनी औकात पाहून बोलले पाहिजे, असे म्हणत कॉग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाण

.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, मंत्री दौरे करत आहेत काजू-बदाम खात आहेत. त्यांना दुष्काळाचे काय देणंघेंण नाही. सरकारकडून चालढकलपणा सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारकडून काही तरी शिकले पाहिजे. कर्नाटक सरकार जर दुष्काळ जाहीर करू शकते तर महाराष्ट्र सरकार कशाची आणि कुणाची वाट पाहत आहे. दिल्लीवाले म्हणतील मग दुष्काळ जाहीर करू असे काही यांच्या डोक्यात आहे का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.

सरकारच्या नियतीत खोट

विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी आता रडतो आहे. कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मंत्र्यांना घरबसल्या जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्व माहिती मिळते, दौरे करण्याची काय गरज आहे. ती माहिती मागवली असती तर आता दुष्काळ जाहीर करता आला असता. पण या सरकारच्या नियतीमध्येच खोट आहे, त्यांना शेतकऱ्यांशी काही देणंघेणं नाही. काल परवा आपण पाहिले उद्योजकांचे 10 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही. कुठल्याही निकषाची वाट न बघता शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. 2024 मध्ये निवडणुकीच्या वेळी मदतीसाठी काढलेल्या जीआरमध्ये बदल केला.

बोंद्रे कायम काँग्रेससोबत राहणार

विजय वडेट्टीवार म्हणाले की, राहुल गांधी आणि राहुल बोंद्रे यांचे बोलणं झाले आहे. राहुल बोंद्रे यांना खोट्या गुन्हात अडकवण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा म्हणून त्यांना त्रास देण्यात आला, त्यातून ते भाजपमध्ये जाण्यासाठी तयार झाले होते. राहुल गांधी यांना बोलण्यानंतर बोंद्रेयांचा प्रवेश आता रद्द झाला आहे. ते आता कायम काँग्रेससोबत राहणार आहे.

हे ही वृत्त वाचा

राहुल गांधींचा फोन अन् बोंद्रेंचा यु-टर्न:अखेरच्या क्षणी राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश रद्द, म्हणाले- सर्व काही गमावले तरी काँग्रेससोबतच राहीन

बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसचा मोठा चेहरा आणि चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी राज्य राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली होती. स्वतः बोंद्रे यांनी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून भाजपप्रवेशावर शिक्कामोर्तबही केले होता. मात्र, या राजकीय नाट्यात थेट दिल्लीतून सूत्रे हलली आणि राहुल गांधी यांनी फोन करून मनधरणी केल्यानंतर बोंद्रे यांनी आपला निर्णय मागे घेतला. भाजपच्या उंबरठ्यावरून बोंद्रे माघारी फिरल्याने काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.