![]()
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत इराणला पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. इराणसोबत भारताने ठामपणे उभे राहावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. या मागणीसाठी 1 ऑक्टोबरला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आंबेडकरांनी केले. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, इराणमधील युद्धाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होऊ शकतो. भारत मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करतो. जर युद्ध वाढले, तर कच्च्या तेलाच्या किमती वाढतील आणि त्याचा परिणाम सामान्य कुटुंबाच्या बजेटवर होईल. देशाचे आर्थिक आणि घरगुती बजेट कोलमडू नये यासाठी कच्चे तेल शक्य तितक्या स्वस्त दरात मिळवण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. भारताने इराणसोबत उभे राहावे प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विरोधी पक्ष गप्प बसले आहेत, त्यामुळे देशात प्रभावी विरोधी पक्ष उरलेला नाही. सामान्य लोकांनी धर्म आणि जातीच्या राजकारणात न अडकता राष्ट्र आणि कुटुंबाच्या आर्थिक प्रश्नांकडे लक्ष द्यावे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इस्रायलसंबंधी भूमिकेवरही त्यांनी आक्षेप घेतला. भारतावर संकट आले तेव्हा इराणने साथ दिली होती, त्यामुळे भारतानेही इराणसोबत उभे राहावे, असे आंबेडकर म्हणाले. कठोर भूमिका घ्यावी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भारताने अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता कठोर भूमिका घ्यावी, असे ते म्हणाले. ब्रिक्स परिषदेत चीनसंदर्भात नेमके कोणते निर्णय झाले, याची माहिती पंतप्रधानांनी देशाला द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. दुष्काळाच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांनी जातीय समीकरणांपेक्षा आर्थिक हिताचा विचार करून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रश्नावर सरकारने त्यांचे म्हणणे ऐकले नाही, असा आरोप करत हे धोरण बदलायचे असेल तर सरकार बदलावे लागेल, असेही ते म्हणाले.
Source link
इराणच्या पाठीशी भारताने ठामपणे उभे राहावे:1 ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, कच्च्या तेलाचे दर वाढण्यापूर्वी सरकारने पाऊल उचलावे– प्रकाश आंबेडकर