Headlines

श्रमिक नगरात गृहिणींच्या हातात ‘होम मिनिस्टर’ची ट्रॉफी:अस्मिता मिठापेल्लींना सोन्याची नथ, अर्चना पतंगेंना चांदीचे नाणे, हेमलता वर्मा यांना पैठणी‎



घर, संसार आणि रोजच्या धावपळीला काही काळ बाजूला ठेवत श्रमिक नगर, सावेडी येथील महिलांनी ‘होम मिनिस्टर’च्या मैदानात उत्साहात सहभाग घेतला. संघर्ष प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत परिसरातील असंख्य महिलांनी सहभाग घेत विविध खेळ

.

महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांना दैनंदिन व्यापातून विरंगुळा मिळावा आणि आत्मविश्वासाला नवी झळाळी मिळावी, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध खेळ सुरू होताच महिलांचा उत्साह शिगेला पोहोचला. टाळ्यांचा कडकडाट, हशा आणि चुरशीच्या खेळांनी संपूर्ण परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले.

स्पर्धेत अस्मिता मिठापेल्ली यांनी बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना सोन्याची नथ देऊन गौरविण्यात आले. अर्चना पतंगे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला असून त्यांना चांदीचे नाणे, तर हेमलता वर्मा यांनी तृतीय क्रमांक पटकावत पैठणीचा मान मिळविला. स्पर्धेचे सूत्रसंचालन शेखर आडेप यांनी केले.

संघर्ष प्रतिष्ठान ट्रस्टच्या या उपक्रमाचे महिलांनी कौतुक केले. अशा स्पर्धांमुळे महिलांना कलागुण सादर करण्याची संधी मिळण्यासोबतच परिसरातील महिलांमध्ये संवाद, मैत्री आणि आपलेपणाची भावना वाढीस लागते, अशी भावना सहभागी महिलांनी व्यक्त केली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संघर्ष प्रतिष्ठान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.याप्रसंगी पोखरणा ज्वेलर्सचे संचालक अनिल पोखरणा, अमित पोखरणा, आकाश पोखरणा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *