Headlines

गणेशोत्सव:मत्स्यापासून कल्कीपर्यंत..शहरातील जुना बाजारात विष्णूच्या दशावतारांचा दरबार!, जय हिंद तरुण मंडळाचा धार्मिक-सांस्कृतिक देखावा ठरतोय आकर्षण‎



जुना बाजार येथील जय हिंद तरुण मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त भगवान विष्णूच्या दशावतारांचा आकर्षक जिवंत देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्याचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारा ह

.

आमदार जगताप म्हणाले, लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देत समाजप्रबोधनाची परंपरा सुरू केली. त्यातून धार्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषय जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध देखाव्यांची परंपरा निर्माण झाली. आजही गणेश मंडळे या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर जनजागृती करीत आहेत.

जय हिंद तरुण मंडळाने यंदा भगवान विष्णूचे दशावतार हा विषय जिवंत देखाव्यातून सादर केला आहे. कलाकारांच्या माध्यमातून साकारलेला हा देखावा धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वारशाची ओळख करून देत आहे. विशेषतः नव्या पिढीला आपल्या अध्यात्मिक परंपरेची माहिती मिळावी, हा त्यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

माजी नगरसेवक तथा मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष विपुल शेटीया म्हणाले, समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून मंडळाच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचे जतन व्हावे, यासाठी यंदा दशावतारांचा जिवंत देखावा साकारण्यात आला आहे. नागरिकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. देखाव्याच्या उद्घाटनप्रसंगी राजाभाऊ कोठारी महाराज, आदेशनाथ महाराज, मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष तथा माजी नगरसेवक विपुल शेटीया, विशाल शेटीया, स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले, नगरसेवक महेश लोंढे, गोरख पडोळे, अतुल कावळे, मनीष फुलडाहाळे, राजेश चेगेडिया, उपाध्यक्ष बाली ठाकूर, उमेश राठोड, अमोल ठाकूर, किरण ठाकूर, दीपक ठाकूर, त्रिशूल उरणे, गणेश होनावळे, सुरज ठाकूर आदींसह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील जुना बाजार येथील जय हिंद तरुण मंडळाने साकारलेल्या भगवान विष्णूचे दशावतारातील नृसिंह अवताराचा जीवंत देखावा.

टिळकांच्या परंपरेला आधुनिक देखाव्याची जोड गणेशोत्सव हा केवळ उत्सव न राहता समाजप्रबोधनाचे माध्यम ठरावा, या उद्देशाने जय हिंद तरुण मंडळाकडून जिवंत देखाव्याची परंपरा सुरू ठेवण्यात आली आहे. धार्मिक विषयातून सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यंदाच्या दशावताराच्या देखाव्यातून करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *