![]()
राज्यात केवळ दुष्काळ जाहीर करून उपयोग नाही, तर शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 1 लाख रुपये आणि शेतमजुरांसाठी प्रत्येकी 25 हजार रुपये मदत शासनाने जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीय. अन्यथा राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी म्हणण्याची वेळ राज्यातील जनतेवर येईल, अशी खंतही व्यक्त केलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातल्या 265 तालुक्यात कोरड्या दुष्काळाची घोषणा केली असून, कृषी आयुक्तांच्या अहवालानुसार या तालुक्यांमध्ये Trigger-1 लागू झाला आहे. महसूल व मदत-पुनर्वसन विभागाने याबाबतचा अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित केला असून, राज्यातील सुमारे 75 टक्के भूभाग आता दुष्काळग्रस्त म्हणून घोषित झालाय. त्या पार्श्वभूमीवर अमित देशमुख यांनी ही मागणी केलीय. अमित देशमुख यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहिलीय. त्यामध्ये ते म्हणतात की, ‘महाराष्ट्र शासनाने पहिल्या टप्प्यात राज्यातील 265 तालुक्यात कोरड्या दुष्काळाची घोषणा केली आहे. ही घोषणा करताना शासनाने ज्या उपाययोजना जाहीर केल्या त्यातून दुष्काळग्रस्तांना कोणताही दिलासा मिळालेला नाही, या परिस्थितीत शासन व विमा कंपन्यांकडून आर्थिक मदत आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्कात सवलत देऊन शेतकऱ्यांना धीर देणे आवश्यक आहे. अन्यथा राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी म्हणण्याची वेळ राज्यातील जनतेवर येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर यावर्षीचा दुष्काळ 1972 च्या दुष्काळापेक्षा अधिक तीव्र आणि गंभीर स्वरूपाचा असल्याचे म्हटलेले आहे, असे असताना अगोदरच माफ असलेले वीजबिल व शेतसारा माफ करण्याची घोषणा करणे म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांची दिशाभूल आहे. विद्यार्थ्यांसाठी फक्त परीक्षा शुल्क माफी करून आपण काहीतरी केले आहे हे दाखवण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.
Source link
वीजबिल, शेतसारा माफ म्हणजे दिशाभूल!:दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अमित देशमुखांचा 6 मुद्द्यांचा मास्टरप्लॅन, CM देवेंद्र फडणवीसांकडे मोठी मागणी