![]()
गडचिरोलीपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर पोरला गावाजवळ बस आणि कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात बीसीएन-युसीएन न्यूजचे संपादक इम्रान शेख आणि त्यांची आई गंभीर जखमी झाले. कारचा अक्षरशः चुराडा झाला. इम्रान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने गडचिरोलीच्या शासकीय रुग्णालयातून तातडीने नागपूरमधील किंग्सवे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णवाहिकेला एस्कॉर्ट देत ग्रीन कॉरिडॉर तयार केला. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. इम्रान यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि दोन मुले कारमध्ये होती, ते सुरक्षित आहेत. इम्रान यांच्या आईवरही उपचार सुरू आहेत. पुढील २४ तास इम्रान यांच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. अपघाताची नेमकी चौकशी पोलीस करत आहेत.
Source link
गडचिरोलीजवळ बस-कार धडक: बीसीएन न्यूजचे इम्रान शेख गंभीर:आईही गंभीर, पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर करून नागपूरला हलवले; कारचा चुराडा