![]()
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांना शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन आणि हरित उपक्रमांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल ग्रीन लीडरशिप अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला आणखी एक मानाचा गौरव प्राप्त झाला आहे. कुलगुरू डॉ. चासकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाच्या विकास प्रक्रियेत पर्यावरणपूरक दृष्टिकोनाला विशेष महत्त्व दिले जात आहे. शाश्वत विकास, हरित परिसर, वृक्षसंवर्धन, पर्यावरण जागृती तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय जाणीव निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘विकासासोबत पर्यावरणाचे संरक्षण’ हा दृष्टिकोन विद्यापीठाच्या विविध उपक्रमांमधून अधोरेखित होत असून, पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रातील या कार्याची दखल घेत डॉ. चासकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दरम्यान, या सन्मानाबद्दल विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी डॉ. मनोहर चासकर यांचे अभिनंदन केले. त्यांच्या पुढील कार्यासाठी विद्यापीठ परिवाराकडून शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
Source link
कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांना ‘ग्लोबल ग्रीन लीडरशिप अवॉर्ड’:शाश्वत विकास आणि पर्यावरण संवर्धनातील योगदानाचा गौरव; विद्यापीठ परिवाराकडून अभिनंदन