Headlines

Pune Metro Record Ridership & Revenue During Ganesh Festival 2026


गणेशोत्सवातील गर्दी, विसर्जन मिरवणुकीचा उत्साह आणि शहरातील वाहतूक कोंडी यावर मात करण्यासाठी पुणेकरांसह बाहेरगावाहून आलेल्या भाविकांनी यंदा मेट्रोला मोठी पसंती दिली. १४ ते २५ सप्टेंबर या १२ दिवसांच्या गणेशोत्सव कालावधीत तब्बल ४८ लाख ३२ हजार ९१५ प्रवाश

.

गणेशोत्सवातील मेट्रो प्रवाशांची संख्या गेल्या दोन वर्षांत झपाट्याने वाढली आहे. २०२४ मध्ये २० लाख ४५ हजार १०० प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला होता. २०२५ मध्ये ही संख्या ३७ लाख १७ हजार ५७८ वर पोहोचली. यंदा ती ४८ लाख ३२ हजार ९१५ झाली. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत २९.९९ टक्के, तर २०२४ च्या तुलनेत तब्बल १३६.३२ टक्के वाढ झाली.

मंडई ठरली सर्वाधिक गर्दीचे स्थानक

गणेशोत्सवात महात्मा फुले मंडई स्थानकावर सर्वाधिक ६ लाख ८२ हजार ४७३ प्रवाशांची नोंद झाली. त्यापाठोपाठ पीसीएमसी (४.७२ लाख), स्वारगेट (४.३५ लाख), रामवाडी (४.०५ लाख) आणि पीएमसी (२.६९ लाख) या स्थानकांवर मोठी गर्दी झाली. मार्गिकानिहाय पीसीएमसी-स्वारगेट मार्गावर २५ लाख १५ हजार ५१६, तर वनाज-रामवाडी मार्गावर २३ लाख १७ हजार ३९९ प्रवाशांनी प्रवास केला. जिल्हा न्यायालय स्थानकावर १० लाख ३९ हजार ४५२ प्रवाशांनी इंटरचेंजचा वापर केला.

विसर्जनाच्या दिवशी ११ स्थानकांवर २० हजारांवर गर्दी

विसर्जनाच्या दिवशी महात्मा फुले मंडई स्थानकावर सर्वाधिक ७० हजार ३७५ प्रवासी आले. डेक्कन जिमखाना (६४,९३८), स्वारगेट (४८,९०६), पीसीएमसी (४३,४९१), रामवाडी (३७,८९४) आणि पीएमसी (३६,५८८) यांच्यासह एकूण ११ स्थानकांवर २० हजारांहून अधिक प्रवाशांची नोंद झाली.

तिकिटातही डिजिटलला पसंती

एकूण प्रवाशांपैकी ७१ टक्के प्रवाशांनी डिजिटल तिकीट, तर २९ टक्के प्रवाशांनी कागदी तिकीट वापरले. पेमेंटमध्येही डिजिटल व्यवहारांचा वाटा ८६ टक्के राहिला. गर्दी लक्षात घेऊन दर पाच मिनिटांनी मेट्रो, २४ तास सेवा आणि प्रमुख स्थानकांवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *