Headlines

अपघातग्रस्तांना 45 मिनिटांऐवजी अवघ्या 10 मिनिटांत मिळेल मदत:पहिल्या टप्प्यात 400 किमीवर यंत्रणा कार्यान्वित होणार




समृद्धी महामार्गावर अपघातानंतर बाधितांना वेळेत मदत मिळावी, यासाठी इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टिम (आयटीएस) कार्यान्वित केली जात आहे. या अत्याधुनिक यंत्रणेद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने वाहनांच्या संशयास्पद हालचाली टिपल्या जातील. यामुळे अपघातानंतर मदत पोहोचण्यासाठी लागणारा ४५ मिनिटांचा वेळ आता केवळ १० मिनिटांवर येणार आहे. ऑक्टोबरअखेर नागपूर ते जालना या ४०० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यात ही यंत्रणा सुरू होईल. तर दुसऱ्या टप्प्यात जानेवारीपर्यंत उर्वरित ३०० किलोमीटरवरील यंत्रणाही पूर्णपणे कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर महामार्गावरील पेट्रोलिंगची पद्धतही बदलणार आहे. १,६९८ कोटींचा प्रकल्प आयटीएस या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी १,६९८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, यात पुढील पाच वर्षांच्या देखभाल खर्चाचाही समावेश आहे. या यंत्रणेमुळे अपघातग्रस्तांना मदत मिळण्यासोबतच सातत्याने कॅमेऱ्याची नजर असल्याने समृद्धी महामार्गावरील चोरी, दरोडेखोरीच्या घटनांनाही आळा बसेल. जानेवारीपर्यंत संपूर्ण महामार्गावर यंत्रणा कार्यान्वित सध्या प्रत्येक २० किलोमीटरवर पेट्रोलिंग सुरू आहे. लवकरच इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टिम कार्यान्वित होईल. जानेवारीपर्यंत संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित होईल – डॉ. अनिलकुमार गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अशी काम करणार यंत्रणा कॅमेरे सतत रस्त्यावरील वाहनांची हालचाल आणि वेग स्कॅन करतील.
वाहन अचानक उलटणे किंवा धडकणे अशा घटना एआय ओळखेल. अपघातापूर्वीच्या आणि नंतरच्या व्हिडिओचे विश्लेषण करून घटनेचे स्वरूप स्पष्ट होईल. अपघाताची शक्यता आढळताच नियंत्रण कक्षाला व्हिडिओ फीडसह अलर्ट मिळेल. जीपीएसच्या माध्यमातून जवळची रुग्णवाहिका, क्विक रिस्पॉन्स वाहन किंवा पोलिस वाहनाला माहिती देऊन तत्काळ मदत पाठवली जाईल. ८ नियंत्रण कक्ष
दर १०० किमीवरील नियंत्रण कक्षातून २४ तास निगराणी
१६ ड्रोन ठेवणार लक्ष
५० किमीवर ड्रोन शूटिंगसह संकटात उद्घोषणा करणार
४८०० सीसीटीव्ही
४८०० पैकी ३२०० सीसीटीव्हीत व्हिडिओ ॲनालिटिक्स तंत्रज्ञान ‘समृद्धी’ला एआय-सीसीटीव्ही, ड्रोनची सुरक्षा
समृद्धी महामार्गावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेऱ्यांच्या जाळ्यांचे एआय ग्राफिक्स.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *