Headlines

सातारा गुन्हेगारी वार्ता:कर्ज फेडण्यासाठी 10 लाखांची मागणी, विवाहितेचा छळ; पतीसह सासू व दीराविरुद्ध गुन्हा दाखल




कर्ज फेडण्यासाठी माहेरून १० लाख रुपये आणावेत, या मागणीवरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी पतीसह सासू व दीराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ३३ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली. नसरुद्दीन इमाम ताशीलदार, परविन इमाम ताशीलदार आणि अझरुद्दीन इमाम ताशीलदार (सर्व रा. वाघगल्ली, मुगळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादीनुसार, घरातील कामे व स्वयंपाक व्यवस्थित करीत नसल्याचे तसेच सतत मोबाईल वापरत असल्याचे कारण काढून तिला शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करण्यात आली. माहेरून १० लाख रुपये आणण्यासाठी वारंवार तगादा लावण्यात आला. पैसे न आणल्याने उपाशी ठेवून छळ केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. २० नोव्हेंबर २०२० ते २१ सप्टेंबर २०२६ दरम्यान हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. तपास पोलीस हवालदार इष्टे करीत आहेत. पार्किंग दिव्यांविना उभ्या जेसीबीला दुचाकीची धडक; तरुण ठार राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षा अथवा पार्किंग दिवे न लावता उभ्या केलेल्या जेसीबीला दुचाकीने पाठीमागून धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला. २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास लिंबफाटा हद्दीतील हायवे ब्रिजवर हा अपघात झाला. प्रशांत फरांदे असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संचिता आबासो फरांदे (वय १९, रा. आनेवाडी, ता. जावळी) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून जेसीबी चालक आकाश गणपती कांबळे (वय ३४, रा. हत्तरगा, ता. निलंगा, जि. लातूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. संचिता व प्रशांत मोटारसायकलवरून पुण्याच्या दिशेने जात होते. लेन क्रमांक तीनवर जेसीबी उभा होता. त्यावर सुरक्षा दिवे नसल्याने मोटारसायकलची जेसीबीला जोरदार धडक झाली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने प्रशांत यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तपास सहायक निरीक्षक काटकर करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *